TRENDING:

13 कोटीच्या खेळाडूने कोहलीच्या RCB ची डोकेदुखी वाढली, कालच संघात आला आणि आज मॅचच्या बाहेर

Last Updated:
सामन्याला 24 तास उरले असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा झटका बसला आहे. कारण आरसीबीचा स्टार गोलंदाज पहिल्या सामन्याआधी बाहेर झाला आहे.
advertisement
1/7
13 कोटीच्या खेळाडूने कोहलीच्या RCB ची डोकेदुखी वाढली, कालच संघात आला आणि आज मॅचच्या बाहेर
28 मार्च 2026 म्हणजेच उद्यापासून आयपीएल 2026च्या हंगामाला सुरूवात होणार आहे.या हंगामातला पहिला सामना हा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे.
advertisement
2/7
आयपीएलचा हा पहिलाच सामना हा एम चिन्नास्वामीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
advertisement
3/7
पण सामन्याला 24 तास उरले असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा झटका बसला आहे. कारण आरसीबीचा स्टार गोलंदाज पहिल्या सामन्याआधी बाहेर झाला आहे.
advertisement
4/7
खरं तर हा खेळाडू स्पर्धेतून बाहेर होईल अशी भीती होती. पण तो काल रात्री आरसीबीच्या कॅम्पमध्ये पोहोचला होता.त्यामुळे टीमला दिलासा मिळाला होता. पण आज तो दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.त्यामुळे आरसीबीला मोठा झटका बसला आहे.
advertisement
5/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू जोश हेझलवूड आहे. आरसीबीने 12.50 कोटी रूपयांना जोश हेझलवूडला ताफ्यात घेतलं आहे. पण हा इतका महागडा खेळाडू घेऊन देखील आरसीबीसमोरच संकट संपत नाही आहे.
advertisement
6/7
खंर तर कालच रात्री जोश हेझलवूड आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर आज तो मैदानात प्रॅक्टीस करताना जखमी झाला होता.त्यामुळे उद्याच्या सामन्याला 24 तास उरले असताना तो स्पर्धेबाहेर झाला आहे.
advertisement
7/7
दरम्यान आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी जोश हेझलवूडच्या दुखापतीची पु्ष्टी केली नाही आहे. पण तो उद्याच्या सामन्यात खेळणार नाही,अशी पुष्टी अँडी फ्लॉवर यांनी दिली आहे. तसेच तो नुकताच विमानातुन उतरला आहे आणि आम्ही त्याच्या तंदुरूस्तीवर लक्ष ठेवून आहोत,अशी माहिती अँडी फ्लॉवर यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
13 कोटीच्या खेळाडूने कोहलीच्या RCB ची डोकेदुखी वाढली, कालच संघात आला आणि आज मॅचच्या बाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल