Sanju Samson : वर्ल्ड चॅम्पियन संजूला CSK कडे जाऊन काय मिळालं? कॅप्टन्सी नाहीच, आता आणखी एक धक्का!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2026 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 28 मार्चपासून आयपीएलच्या 19 व्या मोसमाला सुरूवात होणार आहे.
advertisement
1/7

टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. वेस्ट इंडिजविरुद्धची करो या मरो मॅच, इंग्लंडविरुद्धची सेमी फायनल आणि न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये संजूने अर्धशतकं झळकावली.
advertisement
2/7
3 नॉक आऊट सामन्यांमध्ये 3 अर्धशतकं केल्यामुळे संजूला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, पण टीम इंडियाच्या या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळायच्या आधीच धक्का बसला आहे.
advertisement
3/7
आयपीएल 2026 च्या मोसमाआधी सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ट्रेड डील झाली, ज्यात सीएसकेने राजस्थानकडून संजू सॅमसनला टीममध्ये घेतलं, तर त्याबदल्यात सीएसकेने जडेजाला राजस्थानला दिलं.
advertisement
4/7
आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत संजू हा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. मागच्या काही काळापासून सीएसके धोनीचा उत्तराधिकारी शोधत होती, त्यामुळे संजूला चेन्नईने टीममध्ये आणल्याचं बोललं गेलं, पण टीममध्ये घेऊनही संजूला कॅप्टन्सी मिळाली नाही.
advertisement
5/7
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करणार आहे. सीएसकेकडून कॅप्टन्सी न मिळालेल्या संजूला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या प्रॅक्टिस सेशनमधले फोटो समोर आले आहेत, ज्यात संजू फिल्डिंग करताना दिसत आहे.
advertisement
6/7
टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजू विकेट कीपर होता, तसंच आयपीएलमध्येही राजस्थानकडून खेळताना संजूने कॅप्टन्सीसोबतच विकेट कीपिंगचीही जबाबदारी पार पडली. सीएसकेकडून खेळताना मात्र संजूला ना कॅप्टन्सी मिळाली आहे, ना तो विकेट कीपिंग करू शकेल, असं या फोटोंवरून दिसत आहे.
advertisement
7/7
चेन्नई सुपर किंग्सचा फिल्डिंग कोच जेम्स फॉस्टर याच्यासोबत संजू उंच कॅचची प्रॅक्टिस करत होता. सहसा संजू त्याची बॅटिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर विकेट कीपिंगच्या सरावासाठी जातो, पण आता संजू उंच कॅचची प्रॅक्टिस करत असल्यामुळे तो आयपीएलमध्ये फिल्डिंग करेल तर धोनी हाच विकेट कीपर राहिल, असं दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sanju Samson : वर्ल्ड चॅम्पियन संजूला CSK कडे जाऊन काय मिळालं? कॅप्टन्सी नाहीच, आता आणखी एक धक्का!