TRENDING:

T20 World Cup ला 24 तास शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाच्या पायाखालची जमीन सरकली, सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू 'आऊट'

Last Updated:
Josh Hazlewood will miss T20 World Cup : हेजलवुडच्या रिकव्हरीसाठी अजून वेळ लागणार असल्याने त्याला मैदानात उतरवण्याचा धोका बोर्डाला पत्करायचा नाही. या वेळच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचे 3 खेळाडू आपले पदार्पण करणार आहेत.
advertisement
1/7
T20 World Cup ला 24 तास शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाच्या पायाखालची जमीन सरकली
ऑस्ट्रेलियन टीमचा टूर्नामेंटमधील पहिला मॅच 11 फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्ध आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. त्याआधी आता ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
ऑस्ट्रेलियाचा वेगवान बॉलर जोश हेजलवुड हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. तो अद्याप या दुखापतीतून पूर्णपणे सावरू शकलेला नाही, याची पुष्टी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे.
advertisement
3/7
विशेष म्हणजे, हेजलवुडच्या जागी सध्या टीममध्ये कोणत्याही नवीन खेळाडूचा समावेश केला जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. वेळेनुसार ऑस्ट्रेलिया निर्णय घेईल.
advertisement
4/7
या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार असून हेजलवुड किमान सुपर-8 स्टेजपर्यंत फिट होईल, अशी आशा ऑस्ट्रेलियाला होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आपल्या या मुख्य बॉलरशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.
advertisement
5/7
मात्र, हेजलवुडच्या रिकव्हरीसाठी अजून वेळ लागणार असल्याने त्याला मैदानात उतरवण्याचा धोका बोर्डाला पत्करायचा नाही. या वेळच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचे 3 खेळाडू आपले पदार्पण करणार आहेत.
advertisement
6/7
ऑस्ट्रेलियाचा समावेश ग्रुप 'बी' मध्ये करण्यात आला असून त्यांच्यासोबत श्रीलंका, झिम्बाब्वे, ओमान आणि आयर्लंड या टीम्स आहेत. हेजलवुडची अनुपस्थिती टीमसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
advertisement
7/7
ऑस्ट्रेलियाचा स्क्वॉड - मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅविस हेड, मार्कस स्टोयनिश, ग्लेन मैक्सवेल, कैमरन ग्रीन, मैथ्यू रैनशॉ, कूपर कॉनोली, टिम डेविड, जोश इंग्लिस, बेन ड्वारशुइस, जेवियर बार्टलेट, नाथन एलिस, मैथ्यू कुह्नेमन आणि एडम जम्पा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup ला 24 तास शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाच्या पायाखालची जमीन सरकली, सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू 'आऊट'
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल