TRENDING:

Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?

Last Updated:
आता काही तासात महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी मिळणार असून मानाच्या चांदीच्या गदेवर कोण नाव कोरणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
advertisement
1/7
'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत आता काही तासात महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी मिळणार असून मानाच्या चांदीच्या गदेवर कोण नाव कोरणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
advertisement
2/7
यंदा माती विभागात हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख आणि सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाड यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/7
तर दुसरीकडे गादी विभागात नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर आणि सोलापूर शहरचा जय पाटीलय यांच्यात अंतिम फेरीत लढत पार पडणार आहे.
advertisement
4/7
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लावर बक्षिसांची मोठी खैरात होणार आहे.विजेत्या पैलवानाला विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.
advertisement
5/7
कुस्ती क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान असलेली मानाची गदा विजेत्या मल्लाला दिली जाणार आहे.यावेळचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विजेत्याला आलिशान फॉर्च्युनर गाडी देण्यात येणार आहे.
advertisement
6/7
आलिशान फॉर्च्युनर गाडीसोबत 5 लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे.त्यामुळे अंतिम सामन्यात कमालीची चुरस बघायला मिळायला मिळू शकते.
advertisement
7/7
या बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा दिली जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल