Mitchell Starc Love Story : क्रिकेटवाली लव्ह स्टोरी! मस्करीत एक विनोद केला अन् बालमैत्रिणीच्या प्रेमात स्टार्क 'क्लिन बोल्ड'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mitchell Starc Love Story : मिचेल स्टार्क आणि एलिसा हिली यांची लव्ह स्टोरी बालपणात सुरू झाली होती. बालपणी केलेला एक विनोद खरा ठरला अन् स्टार्कने लग्नगाठ बांधली.
advertisement
1/7

ऑस्ट्रेलियाचा फास्टर बॉलर मिशेल स्टार्क याने टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टी-ट्वेंटीला रामराम ठोकला असला तरी तो वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळणार आहे.
advertisement
2/7
अशातच आता मिशेल स्टार्कच्या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे. मात्र, मिशेल स्टार्कची लव स्टोरी तुम्हाला माहितीये का? तुम्हाला माहिती नसेल तर स्टार्कची पत्नी एलिसा हिली देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे.
advertisement
3/7
मिशेल स्टार्क आणि एलिसा हिली यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. खेळाच्या आवडीमुळे बालपणी या दोघांची भेट झाली. एलिसाची आई स्टार क्रिकेटर होती. तर स्टार्कचे वडील प्रशिक्षक होते.
advertisement
4/7
दोघांना लहानपणापासून खेळाची आवड होती. एकदा सिडनीच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट ज्युनियर क्रिकेट असोसिएशनमध्ये दोघंजण आमने सामने आले. यावेळी ते एक सामना देखील खेळले. त्यानंतर त्यांची मैत्री झाली.
advertisement
5/7
दररोजचं बोलणं चालणं सुरू झालं अन् हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. स्टार्कने लहानपण एकदा विनोद केला होता की, त्याला लहान सोनेरी केसांचा विकेटकीपर आवडते. अलिसा हिलीने ते खरं मानलं. पण नंतर, हा विनोद प्रत्यक्षात घडला.
advertisement
6/7
एलिसा आणि स्टार्क ब्रिस्बेनमध्ये एकत्र वेळ घालवत होते. त्यावेळी अ‍ॅलिसा एनएसडब्ल्यूसाठी हॉकी खेळत होती आणि स्टार्क नॅशनल परफॉर्मन्स स्क्वॉडमध्ये प्रशिक्षण घेत होता. एकमेकांना वारंवार भेटल्यानंतर त्यांना जाणवले की ते मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे.
advertisement
7/7
दोघांनी 2015 मध्ये आयुष्याचा सोबती होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकमेकांसाठी अनेकदा मोठे त्याग केले आहेत. एलिसाने नवऱ्याला वर्ल्ड कप खेळता यावा यासाठी टीममधील आपली जागा सोडली होती. दरम्यान, दोघांनी ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्ड कप देखील जिंकला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mitchell Starc Love Story : क्रिकेटवाली लव्ह स्टोरी! मस्करीत एक विनोद केला अन् बालमैत्रिणीच्या प्रेमात स्टार्क 'क्लिन बोल्ड'