Mohammad Nabi : 6,6,6,6,6,6...40 वर्षाच्या खेळाडूने लंका पेटवली, 7 बॉलमध्ये ठोकल्या 38 धावा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरूद्ध वादळी खेळी केली आहे.या खेळीदरम्यान त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये पाच गगनचुंबी षटकार लगावले आहेत.
advertisement
1/7

अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरूद्ध वादळी खेळी केली आहे.या खेळीदरम्यान त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये पाच गगनचुंबी षटकार लगावले आहेत.
advertisement
2/7
सामन्या बद्दल बोलायचं झालं तर मोहम्मद नबीने सहा षटकार मारले आहेत.अशाप्रकारे त्याने 36 धावा काढल्या.त्यात एक नो बॉल आणि रनआऊट झालेल्या एक धावा मिळून त्याने 38 धावा केल्या आहेत.
advertisement
3/7
मोहम्मद नबीने सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये 5 गगनचुंबी षटकार लगावले आहेत. त्यानंतर सहावा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला होता.त्यामुळे एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम हुकला आहे.
advertisement
4/7
श्रीलंकेकडून शेवटचं षटक घेऊन वेललागे (Wellalage) आला होता. यावेळी वेलालागेच्या पहिल्याच बॉलपासून नबीने प्रहार करायला सुरूवात केली होती.
advertisement
5/7
नबीने सुरूवातीला तीन हॅट्ट्रीक सिक्स मारले त्यानंतर एक बॉल नो पडला.त्यानंतर पुन्हा त्याने दोन षटकार मारले. त्यानंतर नबी सहा बॉल सहा सिक्सचा रेकॉर्ड करेल असे वाटत होते. मात्र शेवटच्या चेंडुवर तो रनआऊट झाला.
advertisement
6/7
या दरम्यान मोहम्मद नबीने 22 बॉलमध्ये 60 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे. या खेळीत त्याने सहा षटकार आणि 3 चौकार मारले आहेत.
advertisement
7/7
नबीच्या वादळी खेळीमुळे अफगाणिस्तान 8 विकेट गमावून 169 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.त्यामुळे आता श्रीलंकसमोर 170 धावांचे आव्हान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mohammad Nabi : 6,6,6,6,6,6...40 वर्षाच्या खेळाडूने लंका पेटवली, 7 बॉलमध्ये ठोकल्या 38 धावा