TRENDING:

IPL Auction आधी मुंबई इंडियन्स मोठा धक्का देणार, 4 खेळाडूंना बाहेर करणार! एकाचं नाव धक्कादायक

Last Updated:
आयपीएल 2026 साठीचा लिलाव 15 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. त्याआधी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व टीमना त्यांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे.
advertisement
1/8
IPL Auction आधी मुंबई धक्का देणार, 4 खेळाडूंना बाहेर करणार! एकाचं नाव धक्कादायक
आयपीएलच्या 2025 च्या मोसमात मुंबई इंडियन्स क्वालिफायरमध्ये पोहोचली, पण क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सने त्यांचा पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारी मुंबई पुढच्या मोसमासाठी 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, ज्यामुळे लिलावामध्ये त्यांची पर्सही वाढेल.
advertisement
2/8
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये दीपक चहरला 9.25 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण चहरला त्याच्या रकमेला आणि नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आयपीएल 2025 च्या 14 सामन्यांमध्ये चहरने 9.17 च्या इकोनॉमी रेटने 11 विकेट घेतल्या.
advertisement
3/8
दीपक चहरला रिलीज केलं तर लिलावामध्ये मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये जास्त रक्कम येईल. मुंबईआधी दीपक चहर सीएसकेकडून खेळला, ज्यात त्याने 95 सामन्यांमध्ये 8.13 च्या इकोनॉमी रेटने 88 विकेट घेतल्या.
advertisement
4/8
रॉबिन मिन्झ याला मुंबईने 65 लाख रुपयांच्या किंमतीमध्ये विकत घेतलं, पण त्याला खेळण्याची फार संधी मिळाली नाही. रॉबिन मिन्झने 2025 च्या मोसमात 2 सामन्यांमध्ये 6 रन केल्या. मिन्झला रिलीज करून मुंबई बॅकअप विकेट कीपर म्हणून दुसऱ्या खेळाडूचा विचार करू शकते. रेयान रिकलटन हा मुंबईचा पहिल्या पसंतीचा विकेट कीपर आहे.
advertisement
5/8
आयपीएल लिलावामध्ये मुंबई इंडियन्सनने अफगाणिस्तानचा स्पिनर अल्लाह घझनफरला विकत घेतलं, पण त्याला आयपीएलआधीच दुखापत झाली, त्यामुळे मुंबईने घझनफरचा बदली खेळाडू म्हणून मुजीब उर रहमानला 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.
advertisement
6/8
मुजीब उर रहमानने 2025 च्या आयपीएलमध्ये फक्त एक मॅच खेळली, ज्यात त्याने 2 ओव्हरमध्ये 28 रन दिले, यानंतर मुजीबला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल लिलावाआधी मुजीबला रिलीज करून घझनफरला रिटेन करण्याची संधी मुंबईकडे आहे. मुजीबने वेगवेगळ्या आयपीएल टीमकडून खेळताना 20 सामन्यांमध्ये 8.34 च्या इकोनॉमी रेटने 20 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
7/8
इंग्लंडचा डावखुरा फास्ट बॉलर रीस टॉपलीला मुंबईने 75 लाख रुपयांना विकत घेतलं, पण आयपीएल 2025 मध्ये टॉपली क्वालिफायर-2 मध्ये पंजाबविरुद्धची एकमेव मॅच खेळला, ज्यात त्याने 3 ओव्हरमध्ये 40 रन दिले. पुढच्या मोसमातही रीस टॉपलीला फार संधी मिळणार नसल्यामुळे मुंबई त्याला बाहेर करण्याचा विचार करू शकते.
advertisement
8/8
इनिंगच्या सुरूवातीला बॉल स्विंग करण्यात माहीर असलेला टॉपली टी-20 फॉरमॅटच्या डेथ ओव्हरमध्ये यॉर्करही टाकतो. आयपीएलमध्ये टॉपली आतापर्यंत 6 सामने खेळला आहे, ज्यात त्याने 5 विकेट मिळवल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL Auction आधी मुंबई इंडियन्स मोठा धक्का देणार, 4 खेळाडूंना बाहेर करणार! एकाचं नाव धक्कादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल