TRENDING:

Sanju Samson : ना फोन, ना सोशल मीडिया! संजू सॅमसन कसा बनला टीम इंडियाचा 'बकासूर'? प्रेस कॉन्फरेन्समध्ये सांगितलं रहस्य

Last Updated:
Sanju Samson Press Conference : संजूने काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. प्रेस कॉन्फरेन्समध्ये संजूने सांगितलं की, बाहेरचा गोंधळ कमी करण्यासाठी त्याने आपला फोन पूर्णपणे बंद केला होता.
advertisement
1/5
Sanju Samson : ना फोन ना सोशल मीडिया! संजू सॅमसन कसा बनला टीम इंडियाचा 'बकासूर'?
भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसन सध्या आपल्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. सेमीफायनलमध्ये संजूने 89 धावांची आक्रमक खेळी केली अन् टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवलं.
advertisement
2/5
संजूने सेमीफायनल मॅचनंतर घेतलेल्या प्रेस कॉन्फरेन्समध्ये एका महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक पैलू समोर आले आहेत.
advertisement
3/5
संजूने काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. प्रेस कॉन्फरेन्समध्ये संजूने सांगितलं की, बाहेरचा गोंधळ कमी करण्यासाठी त्याने आपला फोन पूर्णपणे बंद केला होता. यामुळे त्याला मानसिक शांतता मिळाली
advertisement
4/5
सोशल मीडिया बंद असल्याने तो खेळावर लक्ष केंद्रित करू शकला. मैदानावर त्याने प्रत्येक बॉल आणि सिक्सवर लक्ष दिलं. मी फक्त माझ्या जवळच्या लोकांसोबतच बोलत असतो, असंही संजू सॅमसन म्हणाला.
advertisement
5/5
संजू सॅमसनने यावेळी अभिषेक शर्माला देखील हाच सल्ला दिला. अभिषेक जरी फोकस राहून खेळला तर टीम इंडियाला चांगली ओपनिंग पेअर मिळेल. तो यावर आधीपासून काम करतोय, असंही संजू म्हणालाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sanju Samson : ना फोन, ना सोशल मीडिया! संजू सॅमसन कसा बनला टीम इंडियाचा 'बकासूर'? प्रेस कॉन्फरेन्समध्ये सांगितलं रहस्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल