IND vs PAK : पाकिस्तानच्या बहिष्कारानंतर ICC ॲक्शन मोडवर, यू-टर्न घ्यायला भाग पाडणार, पडद्यामागे काय चाललंय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 ला आजपासून सूरूवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडवर दणदणीत विजय मिळवला आहे.
advertisement
1/6

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 ला आजपासून सूरूवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडवर दणदणीत विजय मिळवला आहे.
advertisement
2/6
या विजयानंतर आता पाकिस्तान आता पुढच्या सामना थेट 10 फेब्रुवारी 2026 ला युएसएशी आहे. यानंतर पाकिस्तानचा पुढचा सामना हा भारताशी आहे. पण पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकल्याने हा सामना होणार की नाही?असा मोठा प्रश्न आहे.
advertisement
3/6
दरम्यान भारत-पाकिस्तान सामना होण्यासाठी तिकडे यजमान असलेल्या श्रीलंकेने देखील पाकिस्तानची बातचीत सूरू केली होती.
advertisement
4/6
श्रीलंकेने पीसीबीला ई मेल करुन भारताविरूद्ध बहिष्कार टाकण्याच्या त्यांच्या निर्णयाने श्रीलकंन क्रिकेट बोर्डला मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती दिली होती.
advertisement
5/6
श्रीलंकन क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी मोहसिन नक्वी यांच्याशी बातचीत केली होती. यामध्ये सिल्वा यांनी श्रीलंकेला पाकिस्तानच्या सहकार्याची गरज असल्याची बाब बोलून दाखवली.कारण भारत पाकिस्तानचा सामना होणार नसल्याने श्रीलंकेच्या तिकीट विक्री आणि हॉटेल व्यवसायावर मोठे नुकसान होणार आहे. सिल्वा यांच्या या आवाहनानंतर यानंतर मोहसीन नक्वी यांनी सिल्वा यांना सरकारशी बातचीत करण्यात येईल,असे आश्वासन देण्यात आल्याची सुत्राची माहिती आहे.
advertisement
6/6
दरम्यान श्रीलंकेच्या आवाहनानंतर पाकिस्तानने बहिष्कार मागे घेण्याचा विचार करायला सूरूवात केली आहे.त्याचसोबत आयसीसी देखील ॲक्शन मोडवर आली आहे. आयसीसीचे डेप्युटी चेअरमन इमरान ख्वाजा यांना पाकिस्तान बोर्डाशी बातचीत करण्याची जबाबदारी देण्याल आली आहे. त्यामुळे सिंगापूर क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारे इमरान ख्वाजा पीसीबी बोर्डाशी बातचीत करून भारताविरूद्ध सामन्याच्या बहिष्कारावरून मनमिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यामुळे दोन्ही बाजूने बातचित सूरू असल्याने पाकिस्तान लवकरच माघार घेईल,अशी आशा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानच्या बहिष्कारानंतर ICC ॲक्शन मोडवर, यू-टर्न घ्यायला भाग पाडणार, पडद्यामागे काय चाललंय?