PM च्या पोरीशी पंगा पडला भारी! मराठी बोलणाऱ्या खेळाडूवर पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा दंड
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pakistani Player Naseem Shah Fine : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या घटनेची गंभीर दखल घेत नसीम शाहवर 2 कोटी पाकिस्तानी रुपये (सुमारे 68 लाख भारतीय रुपये) इतका मोठा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
1/7

पाकिस्तान सुपर लीग गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. पहिल्या दिवसापासून ही लीग वादग्रस्त ठरल्याचं पहायला मिळतंय. लीगच्या उद्घाटनाच्या दिवशीच एका पोस्टमुळे वाद पेटला होता.
advertisement
2/7
पाकिस्तानचा वेगवान बॉलर नसीम शाह याला एका सोशल मीडिया पोस्टमुळे त्याला मोठा आर्थिक फटका बसलाय. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांना 'लॉर्ड्सची क्वीन' म्हणणं त्याच्या अंगलट आलंय.
advertisement
3/7
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या घटनेची गंभीर दखल घेत नसीम शाहवर 2 कोटी पाकिस्तानी रुपये (सुमारे 68 लाख भारतीय रुपये) इतका मोठा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/7
पाकिस्तान सुपर लीगच्या उद्घाटन सोहळ्याला मरियम नवाज यांच्या उपस्थितीवर नसीमने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पीसीबीने ही कृती शिस्तभंग आणि केंद्रीय कराराचे उल्लंघन असल्याची माहिती मिळतीये. मरियम नवाज या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी आहे.
advertisement
5/7
पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड ठरला आहे. हा दंड नसीम शाहला बोर्डाकडून मिळणाऱ्या वार्षिक पगाराच्या तब्बल दोन-तृतीयांश इतका आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडालीये.
advertisement
6/7
पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, नसीम शाहने याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर बिनशर्त माफी मागितली होती. आपलं अकाऊंट हॅक झालंय, असं देखील त्याने ट्विट करत म्हटलं होतं.
advertisement
7/7
मात्र, नसीम शाह याचा काही दिवसापूर्वी मराठीत बोलताना एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता शिस्तपालन समितीने त्याला दोषी ठरवत ही कठोर कारवाई केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PM च्या पोरीशी पंगा पडला भारी! मराठी बोलणाऱ्या खेळाडूवर पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा दंड