Delhi Capital : 'मला माफ करा, तुमच्यासाठी...', मुंबईने पराभव केल्यावर पार्थ जिंदाल यांनी कुणाची माफी मागितली?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Parth Jindal apologize Delhi Capital Fans : आयपीएल 2025 मधील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीला धूळ चारली अन् प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली.
advertisement
1/5

मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारताच आता दिल्ली कॅपिटल्सच्या फॅन्सचं स्वप्न भंगलं आहे. दिल्लीला यंदाच्या 18 व्या सिझनमध्ये देखील ट्रॉफी जिंकता आली नाही. अशातच मालक पार्थ जिंदाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीये.
advertisement
2/5
दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व चाहत्यांची मी माफी मागतो. तुमच्याप्रमाणेच मलाही हंगामाच्या दुसऱ्या सत्राच्या कामगिरीमुळे खूप वाईट वाटत आहे, असं दिल्लीचे मालक पार्थ जिंदाल म्हणाले.
advertisement
3/5
सुरुवात खूप चांगली झाली ती अत्यंत वाईट झाली. या मोहिमेतून काही सकारात्मक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, पण सध्या सर्वांचे लक्ष पुढील सामन्यावर असल्याचं त्यांनी यावेळी पोस्टमध्ये म्हटलं.
advertisement
4/5
आगामी सामना आपल्याला जिंकायचा आहे. हंगामानंतर अनेक पैलूंवर खूप आत्मपरीक्षण करावं लागेल, असं पार्थ जिंदाल यांनी म्हटलं आहे. पार्थ यांनी यातून अक्षर पटेलला इशारा दिलाय की काय? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
5/5
दरम्यान, पार्थ जिंदाल हे व्यवसायात सक्रिय असून, जेएसडब्ल्यू ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांनी ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Delhi Capital : 'मला माफ करा, तुमच्यासाठी...', मुंबईने पराभव केल्यावर पार्थ जिंदाल यांनी कुणाची माफी मागितली?