Team India : पंतप्रधानांच्या हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी, शेजारी स्मृती अन् हरमन, टीम इंडियाचे मोदींसोबतचे Photo
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट टीमची भेट घेतली आहे.
advertisement
1/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट टीमची भेट घेतली आहे.
advertisement
2/8
लागोपाठ तीन पराभवानंतर कठीण टप्प्यातून बाहेर पडत टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, भारतीय टीमच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं.
advertisement
3/8
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने 2017 साली पंतप्रधान मोदींना ट्रॉफीशिवाय भेटल्याची आठवण करून दिली. आता आम्हाला ट्रॉफी मिळाली आहे, त्यामुळे पंतप्रधानांना आणखी अनेकदा भेटण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया हरमनप्रीत कौरने दिली आहे.
advertisement
4/8
तेव्हा पंतप्रधान मोदींनी स्वप्न पूर्ण करण्यासाटी कठोर मेहनत करा, असं सांगितलं होतं. त्यांचे शब्द आमच्या लक्षात राहिले, असं ऑलराऊंडर दीप्ती शर्मा म्हणाली आहे.
advertisement
5/8
दुसरीकडे टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधानाने पंतप्रधानांकडून आम्हाला प्रेरणा मिळाली, असं वक्तव्य केलं आहे.
advertisement
6/8
महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं, असं स्मृती मंधाना म्हणाली आहे. वर्ल्ड कप विजयानंतर पंतप्रधानांना भेटणं हा टीममधल्या प्रत्येकासाठी भावनिक क्षण असल्याची प्रतिक्रिया स्मृतीने दिली.
advertisement
7/8
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी राजधानी नवी दिल्लीमध्ये आली आहे. यानंतर बुधवारी संध्याकाळी भारतीय टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाली.
advertisement
8/8
रविवारी नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 रननी पराभव केला आणि पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला. महिला टीमने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभरात जोरदार जल्लोष केला गेला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : पंतप्रधानांच्या हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी, शेजारी स्मृती अन् हरमन, टीम इंडियाचे मोदींसोबतचे Photo