IND vs PAK : टीम इंडियाने उस्मान तारीकवर उपाय शोधला,पण सलमानने एका वाक्यात भारताच्या प्लानची हवा काढली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताचा उस्मान तारीक विरूद्ध खेळण्याचा प्लान होता.पण पाकिस्तानी कर्णधार सलमान आघाने आता या प्लानची सगळी हवा काढली आहे.
advertisement
1/8

आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये उद्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
advertisement
2/8
या सामन्याआधी पाकिस्ताना वादग्रस्त बॉलर असलेल्या उस्मान तारीकची प्रचंड चर्चा रंगली आहे.त्याच्या बॉलिंग अॅक्शनवरून मोठा वाद पेटला आहे.
advertisement
3/8
पण या वादा दरम्यान गोलंदाजी करताना पॉज घेणाऱ्या उस्मान तारीक विरोधात खेळण्यासाठी एक जबरदस्त प्लान केला होता.विशेष म्हणजे हा प्लान त्यांना टीम इंडियाचा माजी स्पिनर गोलंदाज आर.अश्विनने सुचवला होता.
advertisement
4/8
जर उस्मान तारीकने गोलंदाजी करताना पॉज घेतला तर भारतीय खेळाडूंनी क्रिज सोडावं.आणि जर अंपायर आणि बॉलरने आक्षेप घेतला तर त्यांना बॉलर गोलंदाजी करताना थांबला म्हणून आम्हाला वाटलं त्याला बॉलिंग टाकायची नाही, म्हणून क्रिज सोडल्याचे सांगायचे.
advertisement
5/8
अशाप्रकारे उस्मान तारीक विरूद्ध खेळण्याचा प्लान होता.पण पाकिस्तानी कर्णधार सलमान आघाने आता या प्लानची सगळी हवा काढली आहे.
advertisement
6/8
खरं तर भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याआधी सलमान आघाची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत सलमानने आगा टीम इंडियाच्या प्लानवर बोलून गेला.
advertisement
7/8
उस्मान तारीकच्या गोलंदाजीविरोधात अश्विनने सुचवलेला प्लान जरी भारतीय खेळाडूंनी मॅचमध्ये अंमलात आणला तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही आहे. कारण उस्मान दोनदा आयसीसीच्या चाचणीला सामोरे गेला होता आणि त्याला दोन्ही वेळा दोषमुक्त करण्यात आले होते.
advertisement
8/8
त्यामुळे आयसीसीने त्याच्या गोलंदाजीला परवानगी दिल्यामुळे टीम इंडियाला अश्विनने सुचवलेला प्लान फारसा चालणार नाही. त्यामुळेच सलमान आघाने टीम इंडियाच्या प्लानची हवा काढली आहे असे दिसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : टीम इंडियाने उस्मान तारीकवर उपाय शोधला,पण सलमानने एका वाक्यात भारताच्या प्लानची हवा काढली