नाद करतो काय! IPL 2026 ऑक्शनच्या 2 दिवसआधी सरफराजने भाव वाढवला; 256 च्या स्ट्राईक रेटने जिंकवली मॅच
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2026 Auction Sarfaraz Khan : भारताचा युवा खेळाडू सरफराज खान याला मागील दोन आयपीएल ऑक्शनमध्ये बोली लागली नव्हती. अशातच आता यंदाच्या ऑक्शनमध्ये त्याने 70 लाख बेस प्राईज ठेवली आहे.
advertisement
1/5

दोन दिवसानंतर म्हणजेच 16 डिसेंबरला आयपीएल 2026 चा मिनी-लिलाव अबू धाबी येथे होणार आहे. आयपीएल 2026 च्या लिलावासाठी एकूण 359 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
advertisement
2/5
आयपीएल ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा युवा फलंदाज सरफराज खान याने सैयद मुश्ताक अली टी-ट्वेंटी टुर्नामेंटमध्ये आपल्या बॅटने धमाका केल्याचं पहायला मिळालं.
advertisement
3/5
238 रन्सचं मोठं टार्गेट असताना सरफराजने 25 बॉलमध्ये 64 रन्सची महत्त्वपूर्ण आणि आक्रमक खेळी केली. त्याचा स्ट्राईख 256 इतका जबरदस्त होता, ज्यामुळे IPL संघांचे लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे.
advertisement
4/5
हरियाणाने दिलेल्या 238 रन्सच्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना फलंदाजांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स केला. सलामीचा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने केवळ 48 बॉलमध्ये आपलं शानदार शतक पूर्ण केलं.
advertisement
5/5
जयस्वालची धडाकेबाज खेळी संघाला विजयाच्या जवळ घेऊन गेली. मात्र, सरफराज खानची 64 रन्सची खेळी अत्यंत निर्णायक ठरली, कारण सरफराजने प्रतिस्पर्धी संघाला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
नाद करतो काय! IPL 2026 ऑक्शनच्या 2 दिवसआधी सरफराजने भाव वाढवला; 256 च्या स्ट्राईक रेटने जिंकवली मॅच