मराठमोळ्या Smriti Mandhana ने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारी भारताची पहिली खेळाडू!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana breaks Virat Kohli record : स्मृती मंधानाने 63 बॉलमध्ये 125 धावांची खेळी केली. यामुळे ती वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
advertisement
1/7

भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मंधानाने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मॅचमध्ये 50 बॉलमध्ये शतक पूर्ण करून इतिहास रचला.
advertisement
2/7
स्मृती मंधानाने 63 बॉलमध्ये 125 धावांची खेळी केली. यामुळे ती वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
advertisement
3/7
स्मृती मंधानाने माजी कर्णधार विराट कोहलीचा 52 बॉलमध्ये शतक करण्याचा विक्रम मोडला. हा रेकॉर्ड 2013 पासून विराट कोहली याच्या नावावर होता. अशातच तिने आता किंग कोहलीला देखील मागं टाकलं आहे.
advertisement
4/7
केवळ 50 बॉलमध्ये शतक पूर्ण करून मंधाना महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारी दुसरी खेळाडू बनली आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या करेन रोल्टनचा 57 बॉलमध्ये केलेल्या शतकाचा विक्रम मोडला.
advertisement
5/7
सर्वात जलद शतक करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंगच्या नावावर आहे. तिने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 45 बॉलमध्ये शतक केले होते.
advertisement
6/7
मंधानाने तिच्या शतकी खेळीत 14 फोर आणि 4 सिक्स मारले. एका वर्षात चार वनडे शतक झळकावणारी ती पहिली महिला बॅटर ठरली आहे. 2024 मध्ये तिने ही कामगिरी केली.
advertisement
7/7
सलग दोन वनडे शतक करणारी ती ऑस्ट्रेलियाच्या टॅमी ब्यूमोंटनंतर दुसरी महिला बॅटर आहे. महिला वनडे मॅचमध्ये सर्वात जास्त शतक करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या एमी सॅटर्थवेटच्या नावावर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
मराठमोळ्या Smriti Mandhana ने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारी भारताची पहिली खेळाडू!