TRENDING:

T20 WC Semifinals : पहिल्या सेमीफायनलला सपोर्ट कुणाला करायचा? साऊथ अफ्रिका की न्यूझीलंड? फायनलमध्ये कोण धोकादायक?

Last Updated:
SA vs NZ T20 World Cup 1st Semifinal : टीम इंडियाने सेमीफायनल जिंकेल यात शंका नाही. पण फायनलमध्ये टीम इंडियाविरुद्घ कोण खेळणार? पहिल्या सेमीफायनलला आपण कुणाला सपोर्ट करायचा असा सवाल तुम्हाला देखील पडला असेल.
advertisement
1/7
पहिल्या सेमीफायनलला सपोर्ट कुणाला करायचा? साऊथ अफ्रिका की न्यूझीलंड?
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलच्या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार असून, या मॅचमधील विजेता टीम थेट 8 मार्चच्या ग्रँड फायनलमध्ये प्रवेश करणार आहे.
advertisement
2/7
दुसरीकडे, 5 मार्च रोजी भारतीय टीमचा सामना बलाढ्य इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या दोन्ही सेमीफायनलमध्ये ज्या टीम्सना विजय मिळेल, त्यांच्यात विजेतेपदासाठी महामुकाबला होईल.
advertisement
3/7
टीम इंडियाने सेमीफायनल जिंकेल यात शंका नाही. पण फायनलमध्ये टीम इंडियाविरुद्घ कोण खेळणार? पहिल्या सेमीफायनलला आपण कुणाला सपोर्ट करायचा असा सवाल तुम्हाला देखील पडला असेल.
advertisement
4/7
पहिल्या सेमीफायनलमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. काहीजण साऊथ अफ्रिकेला सपोर्ट करतायेत तर काहींनी न्यूझीलंडसोबत आपलं मत मांडलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की, साऊथ अफ्रिकेने टीम इंडियाला हरवलं आहे.
advertisement
5/7
सुपर 8 मध्ये साऊथ अफ्रिका टीम इंडियावर भारी राहिली आहे. तर दुसरीकडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाने न्यूझीलंडला टी-ट्वेंटी मालिकेत हरवलं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी साऊथ अफ्रिका परवडणार नाही, अशी चर्चा होताना दिसतीये.
advertisement
6/7
टीम इंडिया जर साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी उतरली तर भारतीय संघावर तुलनेत जास्त प्रेशर असणार आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध सामना झाला तर टीम इंडिया प्रेशर न घेता खेळू शकेल.
advertisement
7/7
दरम्यान, वेगळं सांगायची गरज नाही पण फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड सर्वांना माहितीच आहे. साऊथ अफ्रिकेने याच मैदानावर सुपर 8 मध्ये टीम इंडियाला हरवलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 WC Semifinals : पहिल्या सेमीफायनलला सपोर्ट कुणाला करायचा? साऊथ अफ्रिका की न्यूझीलंड? फायनलमध्ये कोण धोकादायक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल