TRENDING:

IND vs ENG : ना संजू सॅमसन ना शिवम दुबे! सुनील गावस्करांची मोठी भविष्यवाणी, इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचे 2 खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'

Last Updated:
Sunil Gavaskar Prediction On Ind Vs Eng Semifinal : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. सुनील गावस्करांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. काय म्हणाले लिटिल मास्टर? पाहा
advertisement
1/7
IND vs ENG : ना संजू सॅमसन ना शिवम दुबे! सुनील गावस्करांची मोठी भविष्यवाणी
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही टीमसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. अशातच आता सुनील गावस्करांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. काय म्हणाले लिटिल मास्टर? पाहा
advertisement
2/7
इंग्लंड आणि भारत दोन्ही टीम चांगली आहे. दोन्ही टीमच्या बॅटर आणि बॉलर्सने वर्ल्ड कपमध्ये चांगलं प्रदर्शन केलंय. दोघांकडे मिडल ऑर्डर आणि फिनिशर चांगले आहेत. त्यामुळे सामना रोमांचक होईल, असं गावस्कर म्हणाले.
advertisement
3/7
भारतासाठी इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक धोक्याची घंटा ठरू शकतो. पण टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह आहे. बुमराहकडे जॉस बटलर, फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रुक यांना माघारी पाठवण्याची जबाबदारी असेल, असंही गावस्कर म्हणाले.
advertisement
4/7
जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. त्याचबरोबर इतर बॉलर्सला देखील टाईट ओव्हर कराव्या लागतील. जर बुमराहने लवकर बॉलिंग केली तर टीम इंडियासाठी ते फायदेशीर असणार आहे, असंही गावस्कर म्हणाले.
advertisement
5/7
टीम इंडियाची एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे लवचिकता... तिलक वर्मासारखे बॅटर कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहेत. तिलक वर्मा, जो परिस्थितीचे चांगले मूल्यांकन करतो, त्यामुळे आज तो गेमचेंजर ठरेल, असंही गावस्कर म्हणाले.
advertisement
6/7
तिलक वर्माने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केल्याने तो परिस्थितीचे बारकावे समजू शकतो. तो खालच्या क्रमांकावर आल्यास फास्ट बॅटिंग करतो. वर आल्यावर त्याला संयमी खेळावं लागतं, असंही गावस्कर म्हणालेत.
advertisement
7/7
दरम्यान, संजूने वेस्ट इंडिजविरुद्ध ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे सॅमसनवरील दबाव बऱ्याच प्रमाणात कमी झालाय. त्याने परिस्थितीचे बारकावे समजून घ्यावे आणि बॅटिंग करावी, असा सल्ला देखील त्यांनी संजूला दिलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : ना संजू सॅमसन ना शिवम दुबे! सुनील गावस्करांची मोठी भविष्यवाणी, इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचे 2 खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल