'जेव्हा तुमचं मन एखाद्या...', लग्नाची चर्चा सुरू असताना Kavya Maran चं मोठं वक्तव्य 'माझ्या भावना मी...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sunrisers Hyderabad Owner Kavya Maran : मागील आयपीएल हंगामात सर्वात घातक टीम ठरणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. हैदराबादचा संघ यंदा सहाव्या क्रमांकावर राहिला.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. काव्या आणि गायक अनिरुद्ध रविचंद्रन सुमारे एक वर्षापासून डेटिंग करत आहेत, अशी माहिती समोर आली होती.
advertisement
2/7
सनरायझर्स हैदराबाद सर्वात तगडा संघ वाटत असताना मालकिन काव्या मारनच्या पदरी अखेर निराशा पडल्याचं दिसून आलं. अशातच आता काव्या मारनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
3/7
जेव्हा सनरायझर्स हैदराबादचा विषय येतो, तेव्हा माझ्या भावना मी लपवून ठेवत नाही. त्या भावना उघडपणे असतात, असं हैदराबादची मालकीन काव्या मारन फॉर्च्युन इंडियाशी बोलताना म्हणाली.
advertisement
4/7
मला वाटतं जेव्हा तुम्ही तुमचं मन आणि आत्मा एखाद्या गोष्टीत घालता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्याच्या यश आणि अपयशांशी खूप संलग्न होता, असंही काव्या मारनने म्हटलं आहे.
advertisement
5/7
मी हैदराबादमध्ये 'मन आणि आत्मा' ओतला आहे आणि मॅचच्या निकालांशी मी 'वैयक्तिकरित्या जोडलेली' असते, ज्याचा प्रसारकांचे कॅमेरामन शोध घेतात आणि कॅप्चर करतात, असंही काव्या म्हणाली.
advertisement
6/7
जेव्हा मी अहमदाबाद किंवा चेन्नईला जाते आणि मी खूप फूट अंतरावर बसते, तेव्हा कुठंतरी, कॅमेरामन मला शोधण्यात यशस्वी होतो. त्यानंतर मिम्स कसे तयार होतात, ते समजतं, असंही काव्या म्हणाली.
advertisement
7/7
दरम्यान, काव्या आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची सीईओ आहे. या संघाच्या सर्व सामन्यांमध्ये काव्या स्टँडमध्ये बसून संघाला पाठिंबा देताना दिसते. काव्या मारनची एकूण संपत्ती 400 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'जेव्हा तुमचं मन एखाद्या...', लग्नाची चर्चा सुरू असताना Kavya Maran चं मोठं वक्तव्य 'माझ्या भावना मी...'