Suryakumar Yadav : एवढा मोठा प्लेयर पण सूर्याला एक चूक कळालीच नाही! गंभीरच्या नादात पहिल्याच ओव्हरला गेम बिघडवला
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs SA 2nd T20 : नवी चंदीगढ येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम भारत ला दुसऱ्या T20 मॅच मध्ये दक्षिण आफ्रिका कडून 51 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला.
advertisement
1/6

नवी चंदीगढ येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील विजयासह पाहुण्या दक्षिण आफ्रिकाच्या संघाने 5 मॅचची ही मालिका 1-1 ने बरोबरीत आणली. मात्र, आता सूर्याच्या एका चूकीची चर्चा होताना दिसतीये.
advertisement
2/6
बॅटिंग ऑर्डरमध्ये फ्लेझिबिलिटी हा मुद्दा मागील सामन्यात प्रकर्षाने समोर आला. मोठ्या मॅचमध्ये, जेव्हा 214 धावांची गरज असते, तेव्हा संघातील आघाडीच्या 4 फलंदाजांकडून धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा असते.
advertisement
3/6
अक्षर पटेलला 3 नंबरवर पाठवणं हा प्रयोग होता, पण अशा कठीण परिस्थितीत, T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल किंवा फायनल मॅच मध्ये ज्याला तुम्ही 3 नंबरवर पाहू शकता, अशा तज्ज्ञ फलंदाजाला खेळताना पाहण्याची अपेक्षा असते.
advertisement
4/6
बॅटिंग ऑर्डरमध्ये या फ्लेक्झिबिलीटीचा तोटा असा असतो की, एका विशिष्ट स्थानावर खेळाडूला पुरेसा खेळण्याचा वेळ मिळत नाही, ज्यामुळे तो त्या भूमिकेसाठी तयार होऊ शकत नाही. हीच चूक सूर्या गंभीरच्या नादात सातत्याने करतोय.
advertisement
5/6
मागील पत्रकार परिषदेत सूर्याने सर्वांसमोर मान्य केलंय की, टीम इंडियामध्ये फ्लेक्झिबिलिटी नक्कीच असेल. नंबर 3 पासून नंबर 8 पर्यंत कोणताही खेळाडू कुठेही खेळू शकतो. तशी मानसिक तयारी करावी.
advertisement
6/6
दरम्यान, एका बाजूला विकेट पडत असताना तिलक वर्माने दुसऱ्या बाजूने झुंज दिली. अखेरपर्यंत तिलक झुंजला. त्याने केवळ 34 बॉल मध्ये 2 फोर आणि 5 सिक्स च्या मदतीने 62 धावांची शानदार खेळी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : एवढा मोठा प्लेयर पण सूर्याला एक चूक कळालीच नाही! गंभीरच्या नादात पहिल्याच ओव्हरला गेम बिघडवला