IND vs SA : अक्षर पटेलला नंबर 3 वर का पाठवलं? गंभीरच्या चुकीवर सूर्यकुमारने अलगत टाकला पडदा, कारणही सांगितलं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav On Axer Patel batting Order : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यावर बोलताना सूर्यकुमार यादवने अक्षर पटेलच्या बॅटिंगमधील प्रमोशनवर भाष्य केलं.
advertisement
1/5

मैदानात दव होतं, जर प्लॅन वर्क करत नव्हता तर आमच्याकडे दुसरा प्लॅन असायला हवा होता. पण आम्ही त्यावर काम केलं नाही. तसेच शुभमन आणि मी चांगली सुरूवात द्यायला हवी होती, असंही सूर्या म्हणाला आहे.
advertisement
2/5
अक्षर पटेलला नंबर 3 वर का पाठवलं? याचं उत्तर सूर्यान दिलंय. आम्ही वनडे क्रिकेटमध्ये पाहिलंय की अक्षर पटेल त्याच अंदाजात बॅटिंग करत होता. आम्हाला आज वाटत होतं की तो आजही तशीच बॅटिंग करेल पण दुर्देवाने तसं काही घडलं नाही.
advertisement
3/5
अक्षर पटेलने आज तशी चांगली बॅटिंग केली. आता पुढच्या मॅचमध्ये काय होतंय पाहुया, असं सूर्यकुमार म्हणाला. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये अक्षरची जागा धोक्यात आहे का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
4/5
आम्ही प्रत्येकवेळी अभिषेक शर्मावर डिपेन्ड राहू शकत नाही. तो ज्याप्रकारे बॅटिंग करतो, कधी तरी तो देखील खराब शॉट खेळून आऊट होऊ शकतो, असं म्हणत सूर्याने अभिषेकला क्लिन चीट दिली.
advertisement
5/5
दरम्यान, बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केल्याने गौतम गंभीरवर पुन्हा टीका होताना दिसत आहे. अशातच सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा गंभीरच्या चुकांवर पदडा टाकण्याचं काम केलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : अक्षर पटेलला नंबर 3 वर का पाठवलं? गंभीरच्या चुकीवर सूर्यकुमारने अलगत टाकला पडदा, कारणही सांगितलं!