TRENDING:

Suryakumar Yadav wife : सूर्यकुमारच्या पत्नीची 'हॅटट्रिक', मुंबईत खरेदी केलं 7.18 कोटींचं आलिशान घर, डोळे गरागरा फिरतील!

Last Updated:
Suryakumar Yadav wife Devisha adds third luxury apartment : मुंबईच्या देओनार भागात सूर्याने एक अतिशय लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले असून, त्याची किंमत ऐकून कोणाचेही डोळे विस्फारतील. विशेष म्हणजे, एकाच गृहसंकुलात सूर्याने घरांची जणू 'हॅट्ट्रिक'च साधली आहे.
advertisement
1/7
सूर्यकुमारच्या पत्नीने मुंबईत खरेदी केलं 7.18 कोटींचं आलिशान घर
मैदानावर आपल्या बॅटिंगने भल्याभल्या बॉलर्सची झोप उडवणारा 'मिस्टर 360' म्हणजेच सूर्यकुमार यादव सध्या क्रिकेटमुळे नाही, तर रिअल इस्टेटमधील मोठ्या खरेदीमुळे तो चर्चेत आला आहे.
advertisement
2/7
मुंबईच्या देओनार भागात सूर्याच्या पत्नीने एक अतिशय लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले असून, त्याची किंमत ऐकून कोणाचेही डोळे विस्फारतील. विशेष म्हणजे, एकाच गृहसंकुलात सूर्याने घरांची जणू 'हॅट्ट्रिक'च साधली आहे.
advertisement
3/7
सूर्याची पत्नी देविशा शेट्टी हिने 'गोदरेज स्काय टेरेसेस' या प्रीमियम प्रोजेक्टमध्ये नवीन घर खरेदी केल्याचे समोर आले आहे. या आलिशान घरासाठी त्यांनी तब्बल 7.18 कोटी रुपये मोजले असून, सुमारे 1,500 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे हे घर आहे.
advertisement
4/7
या घरासोबत त्यांना दोन खास पार्किंग स्लॉट्स मिळाले असून, हा व्यवहार 20 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण झाला आहे. याच हाय-प्रोफाईल इमारतीत सूर्याने यापूर्वी मार्च 2025 मध्ये दोन मोठे फ्लॅट्स खरेदी केले होते.
advertisement
5/7
17 व्या आणि 18 व्या मजल्यावर असलेल्या त्या घरांचे एकत्रित क्षेत्रफळ साधारण 4,222 स्क्वेअर फूट इतके मोठे आहे. या नवीन डीलसाठी सूर्याने 35.90 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये रजिस्ट्रेशन फी भरली आहे.
advertisement
6/7
आता तिसऱ्या घराच्या गुंतवणुकीमुळे रिअल इस्टेट मार्केटमध्ये सूर्यकुमार यादवची मोठी चर्चा सुरू झाली असून, त्याने मुंबईत आपली पकड अधिक घट्ट केली आहे.
advertisement
7/7
गोदरेज प्रॉपर्टीजने विकसित केलेला हा प्रकल्प आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असून, याचा ताबा जून 2028 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात या प्रोजेक्टमध्ये 202 कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, अनेक बड्या असामींनी येथे घर घेण्यास पसंती दर्शवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav wife : सूर्यकुमारच्या पत्नीची 'हॅटट्रिक', मुंबईत खरेदी केलं 7.18 कोटींचं आलिशान घर, डोळे गरागरा फिरतील!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल