Astrology 2026: धूलिवंदननंतर बुध-गुरू झाले वक्री; 4 राशीच्या लोकांचे टेन्शन वाढणार, एक चूक संकटात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: होळी-धूलिवंदन पार पडल्यानंतर आज 4 मार्चचा दिवस खास आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण या दिवशी बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह वक्री अवस्थेत असतील.
advertisement
1/5

नेहमी वक्री असणारे राहू-केतू आणि या दोन ग्रहांची स्थिती पाहता, एकूण 4 ग्रह दिवशी वक्री चालीत असतील. या ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींना होळीनंतर अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. त्या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
advertisement
2/5
मिथुन - बुध आणि गुरुचे वक्री होणे तुमच्यासाठी फारसे चांगले मानले जात नाही. वाहन चालवताना तुम्हाला खूप सतर्क राहावे लागेल; शक्य असल्यास वाहन चालवणे टाळलेलेच बरे. कौटुंबिक जीवनात संवाद साधताना शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. चुकीच्या संगतीपासून या दिवशी दूर राहा, अन्यथा मानहानी होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
तूळ - तूळ राशीच्या लोकांनी अशा लोकांपासून सावध राहावे जे तोंडावर गोड बोलतात पण पाठीमागे तुमची निंदा करतात. या दिवशी मांस-मदिरा इत्यादींच्या सेवनापासून दूर राहा. आरोग्याची विशेष काळजी घ्या; होळीच्या आनंदात किंवा भावनेच्या भरात अति तलेले पदार्थ खाल्ल्याने प्रकृती बिघडू शकते. या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करावे.
advertisement
4/5
कुंभ - शनीची रास असलेल्या कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी सामाजिक स्तरावर जपून राहण्याची गरज आहे. बोलताना शब्दांचा वापर समजदारीने करा. विनाकारण वादात पडणे टाळावे लागेल. तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवू शकते, त्यामुळे स्वतःच्या वस्तूंची काळजीपूर्वक निगा राखा. उपाय म्हणून महादेवाची उपासना करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल.
advertisement
5/5
मीन - तुमच्या राशीचा स्वामी गुरु स्वतः वक्री आहे आणि बुध ग्रह तुमच्या बाराव्या भावात वक्री स्थितीत असेल. यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. होळीच्या दिवशी किंवा त्यानंतरही कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल, पण घरातील कोणाची खालावलेली प्रकृती तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते. उपाय म्हणून भगवान विष्णूचे नामस्मरण करावे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology 2026: धूलिवंदननंतर बुध-गुरू झाले वक्री; 4 राशीच्या लोकांचे टेन्शन वाढणार, एक चूक संकटात