Pakistan : लाज खेळाडूंनी घालवली, पण बळी 'अंपायर'चा गेला, T20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा ड्रामा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली. स्पर्धेच्या सुपर-8 मध्येच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कारवाईला सुरूवात झाली आहे.
advertisement
1/6

वर्ल्ड कपमधल्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार सलमान आघा आणि बाबर आझमला टी-20 टीममधून बाहेर करण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. तसंच इतर खेळाडू आणि प्रशिक्षकांवरही टीकेची झोड उठली आहे.
advertisement
2/6
खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रत्येक खेळाडूला 50-50 लाख रुपये दंड ठोठावण्याचा विचार करत आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, पण आर्थिक दंड आकारण्याचा विचार सुरू असल्याची प्रतिक्रिया पीसीबीच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
advertisement
3/6
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने ग्रुप स्टेजमध्ये नेदरलँड्स, नामिबिया आणि युएसएविरुद्ध विजय मिळवला, तर भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तान पराभवाच्या छायेत होती, पण नेदरलँड्सने कॅच सोडल्यामुळे पाकिस्तानला थरारक विजय मिळाला.
advertisement
4/6
सुपर-8 मध्ये प्रवेश केल्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला, त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध त्यांना 65 रननी जिंकणं गरजेचं होतं, पण हे शक्य न झाल्यामुळे पाकिस्तानचं आव्हान सुपर-8 मध्येच संपुष्टात आलं.
advertisement
5/6
पाकिस्तानच्या या खराब कामगिरीनंतर अलीम दार यांनी त्यांच्या निवड समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमधला हा पहिला हाय-प्रोफाइल बळी ठरला आहे.
advertisement
6/6
अलीम दार हे आयसीसीचे माजी अंपायर आहेत. अंपायर म्हणून करिअरचा शेवट झाल्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये अलीम दार यांची पाकिस्तान क्रिकेटच्या निवड समितीमध्ये नियुक्ती झाली. अलीम दार यांनी 435 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायर म्हणून भूमिका बजावली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Pakistan : लाज खेळाडूंनी घालवली, पण बळी 'अंपायर'चा गेला, T20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा ड्रामा!