T20 World Cup : इंग्लंडचं खतरनाक त्रिकूट, टीम इंडियाला धोका... बंदोबस्त केला तरच मिळेल फायनलचं तिकीट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे, पण इंग्लंडच्या 3 खेळाडूंपासून टीम इंडियाला सावध राहावं लागणार आहे.
advertisement
1/10

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिली सेमी फायनल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. बुधवार 4 मार्चला कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.
advertisement
2/10
तर दुसरी सेमी फायनल भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरूवार 5 मार्चला होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा हाय व्होल्टेज सामना रंगेल. या सामन्यात विजय मिळवलेली टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. रविवार 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे.
advertisement
3/10
भारत आणि इंग्लंड यांच्यात लागोपाठ तिसऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल होत आहे. 2022 च्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला होता, तर 2024 च्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने या पराभवाचा बदला घेतला. आता तिसऱ्यांदा या टीम आमने-सामने आल्या आहेत.
advertisement
4/10
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामने झाले आहेत, यातले 3 भारताने आणि 2 इंग्लंडने जिंकले. तर वानखेडे स्टेडियमवर दोन्ही टीममध्ये 2 टी-20 मॅच झाल्या, यातल्या एकामध्ये भारताचा आणि दुसऱ्यात इंग्लंडचा विजय झाला.
advertisement
5/10
या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये विजय मिळवायचा असेल, तर इंग्लंडच्या 3 खेळाडूंना शांत ठेवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे, कारण हे तीन खेळाडू एकहाती मॅचचं चित्र बदलू शकतात.
advertisement
6/10
इंग्लंडचा ओपनर जॉस बटलर हा टीम इंडियासाठी सगळ्यात जास्त धोकादायक ठरू शकतो. 2022 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये बटलरने हे दाखवून दिलं आहे. बटलरने त्या सामन्यात 49 बॉलमध्ये 163 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 80 रन केले, त्यामुळे इंग्लंडने तो सामना एकही विकेट न गमावता जिंकला.
advertisement
7/10
जॉस बटलरची बॅट यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये शांत आहे, पण सेमी फायनलमध्ये त्याला सूर गवसला तर टीम इंडियासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. तसंच इंग्लंडच्या टीममध्ये बटलरला आयपीएलचा सर्वाधिक अनुभव आहे, याचा फायदा तो घेऊ शकतो.
advertisement
8/10
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक हा सध्याचा टी-20 क्रिकेटमधला सगळ्यात खतरनाक खेळाडूंपैकी एक आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बॅटिंगसाठी कठीण खेळपट्टीवर ब्रुकने वादळी शतक झळकावून स्वत:ची क्षमता दाखवून दिली होती. वानखेडेची बॅटिंगला अनुकूल असलेली खेळपट्टी आणि छोट्या बाऊंड्री ब्रुकला आणखी धोकादायक बनवतात.
advertisement
9/10
इंग्लंडचा ऑलराऊंडर विल जॅक्स याने या वर्ल्ड कपमध्ये फक्त बॅटच नाही तर बॉलनेही धमाका केला आहे. जॅक्सने यंदाच्या स्पर्धेत 4 प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळवले. एका वर्ल्ड कपमध्ये एवढे पुरस्कार मिळवण्याचा विश्वविक्रमही जॅक्सच्या नावावर झाला आहे.
advertisement
10/10
जॅक्सने या वर्ल्ड कपमध्ये 63 ची बॅटिंग सरासरी आणि 176 च्या स्ट्राईक रेटने 191 रन केले याशिवाय त्याने 7 विकेटही घेतल्या आहेत. याशिवाय जॅक्सला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा अनुभव आहे, ज्यांचं होम ग्राऊंडही वानखेडे स्टेडियम आहे आणि इथेच सेमी फायनलही होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : इंग्लंडचं खतरनाक त्रिकूट, टीम इंडियाला धोका... बंदोबस्त केला तरच मिळेल फायनलचं तिकीट!