TRENDING:

T20 World Cup : सुपर-8 आधी टीम इंडियाने केला धक्कादायक प्रयोग, सूर्याने टॉस जिंकला!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना नेदरलँडविरुद्ध खेळत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे.
advertisement
1/6
सुपर-8 आधी टीम इंडियाने केला धक्कादायक प्रयोग, सूर्याने टॉस जिंकला!
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधले त्यांचे सर्व 3 सामने जिंकले आहेत. भारताने युएसएचा 29 रननी, नामिबियाचा 93 रननी आणि पाकिस्तानचा 61 रननी पराभव केला आहे. पहिल्या 3 विजयानंतर टीम इंडिया सुपर-8 साठी आधीच क्वालिफाय झाली आहे.
advertisement
2/6
सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा 22 फेब्रुवारीला याच मैदानात होणार आहे, त्यामुळे टीम इंडिया नेदरलँडविरुद्धचा हा सामना सुपर-8 स्टेजआधीची मॅच प्रॅक्टिस म्हणून पाहत असेल. या सामन्यातून भारतीय टीमला पिच आणि मैदानाचा अंदाज घ्यायला मदत होईल.
advertisement
3/6
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच टॉस जिंकला आहे.
advertisement
4/6
'आम्ही पहिले बॅटिंग करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसत आहे. मोठा स्कोअर करून रन रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. टीममधील वातावरण सकारात्मक आहे. प्रत्येक सामन्यात कुणीतरी पुढे येऊन जबाबदारी घेत आहे, हे पाहून आनंद वाटतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
5/6
या सामन्यात टीम इंडियामध्ये दोन बदल झाले आहेत. कुलदीप यादवच्या ऐवजी अर्शदीप सिंगचं पुनरागमन झालं आहे. तर अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली असून त्याच्याजागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना कोलंबोमध्ये असल्यामुळे आणि कोलंबोची खेळपट्टी स्पिन बॉलिंगला मदत करणारी असल्यामुळे कुलदीपला संधी मिळाली होती.
advertisement
6/6
भारताची प्लेइंग इलेव्हन : इशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सुपर-8 आधी टीम इंडियाने केला धक्कादायक प्रयोग, सूर्याने टॉस जिंकला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल