Personality Devlopment : 'या' सवयी सांगतात तुमचा आत्मविश्वास झालाय कमी! वेळीच सावरा, नाहीतर गमवाल सेल्फ रिस्पेक्ट
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Tips For Personality Devlopment : आपण बाहेर जातो जॉब करतो. पण बऱ्याचदा आपल्या काही सवयी नकळत आपल्याला आपला आत्मविश्वास कमी करत असतात. हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. ओपन जेव्हा लोक आपल्याला कमी लेखतात, आपल्याला गृहीत धरू लागतात. तेव्हा आपल्याला कळत नाही की आपल्यासोबत असे का होत आहे. आज म्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.
advertisement
1/7

एबीपीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, तुमची चूक नसताना माफी मागणे किंवा तुमचे मत तुम्ही मांडले म्हणून माफी मागणे हे कमी तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी झाल्याचे साकेत असू शकतात. तुम्ही खरंच एखाद्याला दुखावले असेल तर सॉरी म्हणा अन्यथा लोकांसमोर आत्मविश्वासाने उभे राहा.
advertisement
2/7
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही थकलेले असताना आणि गरज नसतानाही एखाद्याने तुम्हाला सांगितलेल्या कमला तुम्ही हो म्हणत असाल तर तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता. यातून असे दिसते की, तुम्ही काहीच बाउंड्रीज सेट केलेल्या नाही. म्हणून कधीकधी नाही म्हणणे देखील गरजेचे असते. त्यामुळे आत्मसन्मान टिकून राहतो.
advertisement
3/7
काही लोक सतत स्वतःला कमी लेखत असतात. ते स्वतःला गंमतीत मूर्ख किंवा अपयशी म्हणतात. कधीकधी ते हे गंभीर परिस्थितीतही बोलतात. पण तज्ञांच्यामते, कायम असे केल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होत जातो. तज्ज्ञ सांगतात, तुम्ही चुका केल्या तरीही स्वतःला तसेच समजून घ्या, जसे तुम्ही इतरांना घेता.
advertisement
4/7
एखादी व्यक्ती कायम प्रशंसा किंवा आश्वासनाची अपेक्षा करत असेल तर त्यांचाही आत्मविश्वास कमी होत असतो. जर्नल ऑफ पर्सनालिटीमध्ये 2018 मध्ये 'कंटिन्जेंट सेल्फ-एस्टीम अँड लाइफ सॅटिस्फॅक्शन : द मेडिएटिंग रोल ऑफ ऑथेंटिकिटी' या शीर्षकाचा एक अभ्यास झालेला, त्यामध्ये असे दाखवेल गेले आहे की, सतत मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केल्याने भावनिक चढउतार होतात, ज्यामुळे आपला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी होत जातो.
advertisement
5/7
तुम्ही तुमच्या बाउंड्रीज सेट करायला हव्यात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हेदेखील कमी आत्मसन्मानाचे लक्षण आहे. स्वतःला जास्त कमिटमेंट्स करणे, इतरांसाठी जेवण वगळणे हे तुमचा आत्मविश्वास कमी झाल्याचे सूचित करते. तुमचा आणि तुमच्या वेळेचा आदर करणे महत्वाचे आहे.
advertisement
6/7
नेहमी इतरांशी तुलना करणेदेखील तुमच्या आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरते. २०२० च्या 'द इफेक्ट ऑफ सोशल कम्पेरिझन ओरिएंटेशन ऑन सायकॉलॉजिकल वेल-बीइंग' या अभ्यासात असे दिसून आले आहे की, आपल्या आयुष्याची तुलना कायम इतरांच्या आयुष्याशी केल्याने तुम्ही स्वतःचे मूल्य कमी करता.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Personality Devlopment : 'या' सवयी सांगतात तुमचा आत्मविश्वास झालाय कमी! वेळीच सावरा, नाहीतर गमवाल सेल्फ रिस्पेक्ट