Team India : प्रॅक्टिस मॅचमध्येही बेंचवर बसवलं, टीम इंडियाच्या स्टारची वर्ल्ड कपमधून हकालपट्टी निश्चित!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे.
advertisement
1/6

नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवरच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 240 रनपर्यंत मजल मारली.
advertisement
2/6
इशान किशनने 20 बॉलमध्ये 265 च्या स्ट्राईक रेटने 53 रनची वादळी खेळी केली, ज्यात 7 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. अर्धशतकानंतर इशान रिटायर्ड आऊट झाला. तर अभिषेक शर्माही 18 बॉलमध्ये 24 रन करून रिटायर्ड आऊट झाला.
advertisement
3/6
दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या तिलक वर्माने 19 बॉलमध्ये 45 रन केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने 16 बॉल 30, अक्षर पटेलने 23 बॉलमध्ये नाबाद 35 आणि हार्दिक पांड्याने 10 बॉलमध्ये 30 रनची खेळी केली. रिंकू सिंग 16 रनवर आऊट झाला.
advertisement
4/6
सराव सामना असल्यामुळे दोन्ही टीमना त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर करायची नव्हती. पण टीम इंडियाकडून संजू सॅमसन आणि शिवम दुबे या दोघांनाच बॅटिंगची संधी मिळाली नाही.
advertisement
5/6
सराव सामन्यामध्ये टीम इंडियाची ही रणनीती बघता संजू सॅमसनला टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यातही बेंचवर बसावं लागण्याची शक्यता आहे. मागच्या काही काळापासून संजू सॅमसन हा संघर्ष करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांमध्येही संजू सपशेल अपयशी ठरला.
advertisement
6/6
न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात संजूऐवजी इशान किशनने विकेट कीपिंग केली. तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यातही इशान किशन ओपनिंगला खेळायला आला आणि त्यानंतर त्याने विकेट कीपिंगही केली, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजूला बेंचवर बसावं लागणार, हे जवळपास निश्चित झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : प्रॅक्टिस मॅचमध्येही बेंचवर बसवलं, टीम इंडियाच्या स्टारची वर्ल्ड कपमधून हकालपट्टी निश्चित!