TRENDING:

'आजकाल हे नॉर्मल झालंय, मी...', ओपन मॅरेज कॉन्सेप्टवर स्पष्टच बोलली प्रियदर्शिनी, सांगितलं कोणाशी लग्न करणार

Last Updated:
Priyadarshini Indalkar: नुकत्याच एका मुलाखतीत तिने लग्नाबद्दल आणि हल्लीच्या ओपन मॅरेजच्या ट्रेंडवर अत्यंत बिंधास्तपणे आपले मत मांडले आहे.
advertisement
1/8
'आजकाल हे नॉर्मल झालंय, मी...', ओपन मॅरेज कॉन्सेप्टवर स्पष्टच बोलली प्रियदर्शिनी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने मराठी मनोरंजन सृष्टीला अनेक कलाकार दिले, त्यातीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. आपल्या खुमासदार विनोदी शैलीने आणि 'दशावतार' सारख्या चित्रपटातील कसदार अभिनयाने प्रियदर्शिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या काळजात घर केले आहे.
advertisement
2/8
सध्या प्रियदर्शिनी तिच्या आगामी 'लग्नाचा शॉट' या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. मात्र, तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाचे सनई चौघडे कधी वाजणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्नाबद्दल आणि हल्लीच्या ओपन मॅरेजच्या ट्रेंडवर अत्यंत बिंधास्तपणे आपले मत मांडले आहे.
advertisement
3/8
'जस्ट नील थिंग्स' या प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये प्रियदर्शिनीने हजेरी लावली होती. लग्नाचा विचार आहे का? या प्रश्नावर तिने अत्यंत प्रॅक्टिकल उत्तर दिले.
advertisement
4/8
ती म्हणाली, "लग्न इतक्यात होईल असे वाटत नाही. लग्नापर्यंत पोहोचण्याआधी खूप टप्पे आहेत. आधी कोणाच्या तरी प्रेमात पडावे लागेल, मग आमची वेव्हलेंथ जुळते का हे पाहावे लागेल आणि त्यानंतर त्या कमिटमेंटपर्यंत पोहोचल्यावर लग्नाचा विचार होईल. त्यामुळे सध्या तरी हा प्रवास लांब आहे."
advertisement
5/8
विशेष म्हणजे, अरेंज मॅरेजपेक्षा 'लव्ह मॅरेज'कडेच तिचा कल असल्याचे तिने स्पष्ट केले. आजकालच्या काळात नात्यांच्या व्याख्या बदलत आहेत. ओपन मॅरेज ज्यामध्ये जोडीदार एकमेकांच्या संमतीने दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवू शकतात, या विषयावर प्रियदर्शिनीने तिचे स्पष्ट मत मांडले.
advertisement
6/8
ती म्हणाली, "समाजात अशा पद्धतीची लग्नं असतील, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही. प्रत्येकाची ती वैयक्तिक पसंती असू शकते. पण, वैयक्तिकरित्या मला हे मुळीच झेपणार नाही. मी या विचाराची नाही."
advertisement
7/8
ती पुढे म्हणाली की, आधीच्या पिढीत घटस्फोट ही मोठी गोष्ट होती, जी आता सामान्य झाली आहे. तसेच कदाचित भविष्यात ओपन मॅरेजही कॉमन होईल, पण तरीही ही संकल्पना स्वीकारणे तिला कठीण वाटते.
advertisement
8/8
प्रियदर्शिनी आणि अभिजित आमकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'लग्नाचा शॉट' हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. लग्नाळू तरुण-तरुणी आणि त्यांच्या कुटुंबाची ही एक रंजक गोष्ट असणार आहे. प्रियदर्शिनीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धमाका करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आजकाल हे नॉर्मल झालंय, मी...', ओपन मॅरेज कॉन्सेप्टवर स्पष्टच बोलली प्रियदर्शिनी, सांगितलं कोणाशी लग्न करणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल