TRENDING:

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा निकाल लागला, पाकिस्तानचं समीकरण काय? सुपर-8 च्या 7 टीम ठरल्या, एका जागेवर तिघांचा दावा!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकेकाळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात आलं आहे. याचसोबत वर्ल्ड कपच्या सुपर-8 स्टेजच्या 8 पैकी 7 टीम निश्चित झाल्या आहेत.
advertisement
1/7
ऑस्ट्रेलियाचा निकाल लागला, पाकिस्तानचं समीकरण काय? सुपर-8 च्या 7 टीम ठरल्या
झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही टीमना 1-1 पॉईंट मिळाला. याचसोबत ग्रुप बी मधून झिम्बाब्वे ही सुपर-8 मध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम ठरली, त्याआधी या ग्रुपमधून सोमवारी श्रीलंका ऑस्ट्रेलियाला हरवून सुपर-8 साठी क्वालिफाय झाली होती.
advertisement
2/7
ग्रुप सी मधून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड आणि ग्रुप डी मधून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवला आहे, त्यामुळे आता सुपर-8 राऊंडसाठी फक्त एका टीमची एन्ट्री शिल्लक आहे, ज्यासाठी तीन टीममध्ये स्पर्धा आहे.
advertisement
3/7
ग्रुप ए मधून सुपर-8 साठी टीम इंडिया क्वालिफाय झाली आहे, तर दुसऱ्या जागेसाठी पाकिस्तान, नेदरलँड आणि युएसए यांच्यात स्पर्धा आहे. बुधवार 18 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचं आव्हान संपुष्टात येईल.
advertisement
4/7
ग्रुप स्टेजमध्ये नेदरलँडचा शेवटचा सामना भारताविरुद्ध होणार आहे, या सामन्यात नेदरलँडला टीम इंडियाचा खूप मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल, कारण त्यांचा नेट रनरेट हा -1.352 आहे. इतक्या खराब नेट रनरेटमुळे नेदरलँडचं आव्हानही जवळपास संपुष्टातच आलं आहे.
advertisement
5/7
सुपर-8 स्टेजमध्ये 8 टीमना 4-4 च्या ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ज्यात भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे एका ग्रुपमध्ये आणि इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड तसंच पाकिस्तान/युएसए/नेदरलँड यांच्यापैकी एक टीम दुसऱ्या ग्रुपमध्ये असेल.
advertisement
6/7
टीम इंडियाचे सुपर-8 चे सामने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहेत. यातला भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना रविवार 22 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये, झिम्बाब्वेविरुद्धचा सामना गुरूवार 26 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना रविवार 1 मार्चला कोलकात्यामध्ये होईल.
advertisement
7/7
सेमी फायनलला प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला या 3 सामन्यांपैकी कमीत कमी 2 सामने तरी जिंकणं गरजेचं आहे, त्यामुळे सुपर-8 मध्ये सूर्यकुमार यादवच्या टीमला सगळे सामने नॉक आऊट सारखेच खेळावे लागणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा निकाल लागला, पाकिस्तानचं समीकरण काय? सुपर-8 च्या 7 टीम ठरल्या, एका जागेवर तिघांचा दावा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल