'एक मूल वाढवण्यापेक्षा...', प्रवाहाच्या विरुद्ध जात 'प्रसिका'चा धाडसी निर्णय, 'बाळ कधी?' विचारणाऱ्यांना जबरदस्त चपराक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Deepika Prasad Vedpathak Prasika: सारख्या विचारल्या जाणाऱ्या 'बाळ कधी होणार?' या प्रश्नाला या जोडीने जे उत्तर दिलंय, ते ऐकून समाजाच्या तथाकथित नियमांना चपराक बसली आहे.
advertisement
1/8

मुंबई : सोशल मीडिया स्टार्स प्रसाद आणि दीपिका वेदपाठक ऊर्फ 'प्रसिका' एका वेगळ्याच अडचणीत अडकले आहेत. त्यांची १० वर्षांची डिजिटल मेहनत, सर्व व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंट्स अचानक सस्पेंड झाल्यामुळे ते खचले आहेत.
advertisement
2/8
अशातच, त्यांनी मांडलेला 'चाइल्ड फ्री' आयुष्याचा विचार पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सारख्या विचारल्या जाणाऱ्या 'बाळ कधी होणार?' या प्रश्नाला या जोडीने जे उत्तर दिलंय, ते ऐकून समाजाच्या तथाकथित नियमांना चपराक बसली आहे.
advertisement
3/8
नेहमी हसतमुख दिसणाऱ्या प्रसाद आणि दीपिकाला अनेकदा सोशल मीडियावर कमेंट्समध्ये विचारलं जायचं, "लग्न होऊन इतकी वर्ष झाली, पाळणा कधी हलणार?" लोकसत्ताच्या एका विशेष कार्यक्रमात यावर बोलताना या जोडीने अत्यंत स्वतंत्र आणि प्रगल्भ विचार मांडला होता.
advertisement
4/8
प्रसाद म्हणाला, "जन्म घेणं आपल्या हातात नसतं, पण जन्म देणं आपल्या हातात आहे. आपला भारत आधीच लोकसंख्येच्या बाबतीत शिखरावर आहे. अशा गर्दीत आणखी एका जिवाची भर टाकण्याची आम्हाला गरज वाटत नाही."
advertisement
5/8
प्रसिकाने घेतलेला हा निर्णय स्वार्थीपणातून नाही, तर अफाट निस्वार्थीपणातून आलेला आहे. स्वतःचं मूल जन्माला घालण्यापेक्षा, ज्यांनी या जगात जन्म घेतलाय पण ज्यांना सांभाळणारं कोणी नाही, अशा अनाथ मुलींचा आधार व्हायचं या जोडीने ठरवलं आहे.
advertisement
6/8
१०० मुलींचे पालकत्व स्वीकारण्याचं भव्य स्वप्न ही जोडी उराशी बाळगून आहे. ज्यांना रक्ताची नाती नाहीत, त्यांना या जोडीने मानवतेचं मोठं नातं दाखवून दिलं आहे. "ज्यांना कोणी नाही, त्यांच्यासाठी आम्ही आहोत," असं या जोडप्याने म्हटलं आहे.
advertisement
7/8
सध्या प्रसिकासाठी वेळ कठीण आहे. त्यांची युट्युब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील लाखो फॉलोअर्स असलेली व्हेरिफाईड चॅनेल्स कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद करण्यात आली आहेत. १० वर्षांच्या मेहनतीवर एका रात्रीत पाणी फिरल्यासारखं झालंय.
advertisement
8/8
मात्र, त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. तांत्रिक आणि कायदेशीर लढा सुरू असतानाच, त्यांच्या या 'सोशल फॅमिली प्लॅनिंग'ची चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'एक मूल वाढवण्यापेक्षा...', प्रवाहाच्या विरुद्ध जात 'प्रसिका'चा धाडसी निर्णय, 'बाळ कधी?' विचारणाऱ्यांना जबरदस्त चपराक