Instant Chutney : सकाळच्या घाईत चटणी बनवायला वेळ मिळत नाही? घरी बनवा इंस्टंट चटणी पावडर; फक्त पाणी घाला आणि 2 मिनिटांत तयार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
विशेषतः जे तरुण घराबाहेर हॉस्टेलवर राहतात किंवा एकटे राहून नोकरी करतात, त्यांच्यासाठी तर सकाळचा नाश्ता बनवणं म्हणजे एक मोठं युद्धच असतं. स्पेशली जेव्हा चटणीची गरज असते.
advertisement
1/6

सकाळी उठल्यावर ऑफिसला जाण्याची घाई, मुलांचा डबा आणि त्यात नाश्त्याचा घाट... या सगळ्यात सर्वात जास्त वेळ खाणारं काम म्हणजे 'चटणी' बनवणं. कधी ओलं खोबरं नसतं, तर कधी मिक्सर लावायचा कंटाळा येतो. विशेषतः जे तरुण घराबाहेर हॉस्टेलवर राहतात किंवा एकटे राहून नोकरी करतात, त्यांच्यासाठी तर सकाळचा नाश्ता बनवणं म्हणजे एक मोठं युद्धच असतं.
advertisement
2/6
अशा वेळी आपण एकतर कोरडा नाश्ता करतो किंवा बाहेरचं पाकीटबंद पदार्थ खातो. पण आता काळजी नको. कारण आज आम्ही तुम्हाला अशा एका 'चटणी प्रीमिक्स'ची रेसिपी सांगणार आहोत, जी एकदा बनवून ठेवली की महिनाभर चटणीची कटकट संपेल. पाहा कशी बनवायची ही 'इन्स्टंट' चटणी.
advertisement
3/6
साहित्य: जे तुमच्या घरात सहज उपलब्ध आहे शेंगदाणे, काजू (पर्यायी) सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता लसूण पाकळ्या, जिरे, मोहरी मीठ, चिंचेचा छोटा तुकडा आणि तेल.
advertisement
4/6
कृती: अगदी सोपी आणि झटपट 1. शेंगदाणे भाजून घ्या: सर्वप्रथम एका पॅनमध्ये शेंगदाणे खमंग भाजून घ्या आणि त्याचे टरफले काढून टाका. 2. त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकून सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि जिरे भाजून बाजूला काढा. 3. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, काजू, लसूण, चिंच, भाजलेला मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक पावडर तयार करा. 4. एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि सुकी मिरची टाकून फोडणी तयार करा. ही फोडणी तयार केलेल्या पावडरमध्ये व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर एका काचेच्या हवाबंद बाटलीत भरून ठेवा. यामुळे ओलावा लागणार नाही आणि पावडर महिनाभर टिकेल.
advertisement
5/6
वापर कसा करायचा? जेव्हा तुम्हाला इडली, डोसा किंवा वडा खायचा असेल, तेव्हा एका वाटीत दोन चमचे हे प्रीमिक्स पावडर घ्या. त्यात गरजेनुसार गरम पाणी टाका आणि मिक्स करा. दोन मिनिटांत ही पावडर पाणी शोषून घेईल आणि तुमची हॉटेलसारखी घट्ट, चविष्ट चटणी तयार होईल.
advertisement
6/6
या प्रीमिक्सचे फायदे वेळेची बचत: सकाळी मिक्सर लावण्याची गरज नाही. प्रवासासाठी उत्तम: तुम्ही गावी किंवा ट्रिपला जात असाल, तर हे सोबत नेऊ शकता. आरोग्यदायी: बाजारातील प्रिझर्व्हेटिव्ह असलेल्या पाकिटांपेक्षा ही घरगुती चटणी कधीही श्रेष्ठ
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Instant Chutney : सकाळच्या घाईत चटणी बनवायला वेळ मिळत नाही? घरी बनवा इंस्टंट चटणी पावडर; फक्त पाणी घाला आणि 2 मिनिटांत तयार