TRENDING:

Team India : 'नॉक आऊट'मध्ये भारताला फक्त एका टीमपासून धोका, कॅप्टन सूर्या कसं भेदणार चक्रव्यूह?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 स्टेजला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. सुपर-8 मध्ये प्रवेश केलेल्या टीमना 4-4 च्या दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. सुपर-8 मध्ये टीम इंडिया त्यांच्या सर्व 3 मॅच कुणाविरुद्ध खेळणार हेदेखील निश्चित झालं आहे.
advertisement
1/7
'नॉक आऊट'मध्ये भारताला फक्त एका टीमपासून धोका, सूर्या कसं भेदणार चक्रव्यूह?
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधली टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. ग्रुप स्टेजमधल्या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियनसारखी खेळली आहे, पण सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडियाला कोणत्याही टीमला हलक्यात घेऊन चालणार नाही.
advertisement
2/7
सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडिया एकूण 3 सामने खेळणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी या 3 पैकी 3 सामन्यांमध्ये भारतीय टीमला विजय मिळवणं गरजेचं आहे, 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी भारतीय टीम सेमी फायनलला प्रवेश करू शकते, पण यासाठी त्यांना नेट रनरेटवरही अवलंबून राहावं लागू शकतं.
advertisement
3/7
सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे 3 सामने हे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहेत. हे सर्व 3 सामने भारताला नॉक आऊट प्रमाणेच खेळावे लागणार आहेत. या 3 मॅचमध्ये एक जरी चूक झाली तरी टीम इंडियाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते.
advertisement
4/7
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना रविवार 22 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे. याचवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 3-1 ने पराभव केला होता. मागच्या काही काळात भारताचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं रेकॉर्डही चांगलं आहे, ज्याचा फायदा भारताला या सामन्यात होऊ शकतो.
advertisement
5/7
टीम इंडियाचा सुपर-8 चा दुसरा सामना 26 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध होईल. ऑस्ट्रेलियाचा पराभव करून झिम्बाब्वेने मोठा उलटफेर केला आणि वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये एन्ट्री घेतली. टी-20 मध्ये टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म बघता झिम्बाब्वेला या सामन्यात विजय मिळवणं कठीण वाटत आहे.
advertisement
6/7
सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडियाचा शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध 1 मार्चला कोलकात्यामध्ये होईल. वेस्ट इंडिजची टीम ही भारतासाठी धोकादायक ठरू शकते, कारण त्यांच्याकडे चांगले पॉवर हिटर्स, ऑलराऊंडर आणि स्पिनरही आहेत.
advertisement
7/7
वेस्ट इंडिजकडे शेमरन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर असे दिग्गज टी-20 खेळाडू, तसंच गुडाकेश मोती आणि रोस्टन चेस हे दोघं उत्कृष्ट स्पिनर आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना भारतामध्ये आयपीएल खेळण्याचाही अनुभव आहे, त्यामुळे टीम इंडियाला वेस्ट इंडिजपासून सावध राहावं लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : 'नॉक आऊट'मध्ये भारताला फक्त एका टीमपासून धोका, कॅप्टन सूर्या कसं भेदणार चक्रव्यूह?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल