Shubman Gill : 'गिल टीममध्ये नको...', वर्ल्ड कप सिलेक्शनवरून मोठा ड्रामा, निवड समितीमध्ये दोन गट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपसाठी शनिवारी भारतीय टीमची घोषणा केली गेली. उपकर्णधार शुभमन गिल यालाच वर्ल्ड कपच्या टीममधून बाहेर केलं गेलं.
advertisement
1/8

मागच्या काही काळापासून शुभमन गिल संघर्ष करत आहे, त्यामुळे त्याच्या टीममधल्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
advertisement
2/8
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा केली, जे अनपेक्षित होतं. टीम मॅनेजमेंटकडून गिलवर रन होत नसतानाही विश्वास दाखवला गेला होता.
advertisement
3/8
आशिया कप 2025 मध्ये गिलचं भारताच्या टी-20 टीममध्ये कमबॅक झालं. गिलसाठी संजू सॅमसनला आधी त्याचं ओपनिंगचं स्थान सोडावं लागलं, यानंतर संजूला टीममधून बाहेरही केलं गेलं. एवढच नाही तर गिलला उपकर्णधारही करण्यात आलं.
advertisement
4/8
कमबॅकनंतरच्या 15 इनिंगमध्ये गिलला एकही अर्धशतक करता आलं नाही, तसंच त्याची सरासरी 25 पेक्षा कमी आणि स्ट्राईक रेट 140 च्या आसपास राहिला.
advertisement
5/8
टीमचा उपकर्णधार झाल्यानंतर गिलकडे टी-20 टीमचा पुढचा कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं. टी-20 वर्ल्ड कपनंतर सूर्यकुमार यादवच्या जागी गिल कर्णधार होईल, असंही बोललं गेलं. पण वर्ल्ड कपची टीम निवडताना निवड समितीच्या बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा झाला.
advertisement
6/8
शुभमन गिलवरून निवड समितीच्या बैठकीत मतभेद झाल्याचं वृत्त आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कोच गौतम गंभीर हे गिलला टीममधून बाहेर करण्याच्या विरोधात होते.
advertisement
7/8
टीम इंडियाच्या निवड समितीमध्ये शिव सुंदर दास, अजय रात्रा, आरपी सिंग आणि प्रग्यान ओझा आहेत. आरपी सिंग, प्रग्यान ओझा आणि आणखी एका निवड समिती सदस्याने गिलच्या निवडीला विरोध केला. 5 पैकी 3 सिलेक्टर विरोधात गेल्यामुळे आगरकरकडे गिलला बाहेर करण्याशिवाय पर्याय नव्हता.
advertisement
8/8
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रिंकू सिंग
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shubman Gill : 'गिल टीममध्ये नको...', वर्ल्ड कप सिलेक्शनवरून मोठा ड्रामा, निवड समितीमध्ये दोन गट!