TRENDING:

Team India : पराभव लागला जिव्हारी, टीम इंडियाचा स्टार घेणार निवृत्ती, मित्रानेच दिली मोठी बातमी!

Last Updated:
इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा धक्कादायक पराभव झाला आहे. याचसोबत टीम इंडियावर वनडे सीरिज 2-1 ने गमावण्याची नामुष्की ओढावली आहे.
advertisement
1/7
पराभव लागला जिव्हारी, टीम इंडियाचा स्टार घेणार निवृत्ती, मित्रानेच दिली अपडेट!
तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाची बॉलिंग आणि बॅटिंगही अपयशी ठरली. टॉस जिंकून पहिले बॉलिंग करताना भारतीय बॉलर्सनी 50 ओव्हरमध्ये 337 रन दिल्या. अर्शदीप, हर्षितला 3-3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीपला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
2/7
नितीश कुमार रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांना एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शतक ठोकलं, त्यामुळे न्यूझीलंडला 337 रन करता आले.
advertisement
3/7
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची बॅटिंग गडगडली. रोहित शर्मा 11, शुभमन गिल 23, श्रेयस अय्यर 3, केएल राहुल 1 आणि रवींद्र जडेजा 12 रनवर आऊट झाला. रवींद्र जडेजाने या सीरिजमध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे.
advertisement
4/7
ऑलराऊंडर असलेल्या जडेजाला या पूर्ण सीरिजमध्ये एकही विकेट घेता आली नाही. तर 3 सामन्यांमध्ये त्याने फक्त 43 रन केल्या आहेत. पहिल्या सामन्यात त्याने 4 रन, दुसऱ्या सामन्यात 27 आणि तिसऱ्या सामन्यात 12 रन केले.
advertisement
5/7
पहिल्या सामन्यात जडेजाने 9 ओव्हरमध्ये 56 रन, दुसऱ्या सामन्यात 8 ओव्हरमध्ये 44 रन आणि तिसऱ्या सामन्यात 6 ओव्हरमध्ये 41 रन दिल्या. या 3 सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाला एकही विकेट मिळाली नाही.
advertisement
6/7
न्यूझीलंडविरुद्धच्या या निराशाजनक कामगिरीनंतर रवींद्र जडेजा वनडे क्रिकेटमधून निवृत्त होईल, असं बोललं जात आहे. रवींद्र जडेजाचा माजी सहकारी आणि क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीनेही त्याचे संकेत दिले आहेत.
advertisement
7/7
'रवींद्र जडेजा गेल्या काही वर्षांपासून भारतासाठी एक उत्तम आणि मॅच विनर खेळाडू आहे, पण हा त्याचा शेवटचा सामना असू शकतो का? तो शांतपणे बाहेर पडण्याआधी आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. भारताचा पुढचा वनडे सामना जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध आहे', असं श्रीवत्स गोस्वामी म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : पराभव लागला जिव्हारी, टीम इंडियाचा स्टार घेणार निवृत्ती, मित्रानेच दिली मोठी बातमी!
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल