TRENDING:

IND vs PAK : 'ट्रम्पकार्ड' म्हणून डोक्यावर घेतलं, नंतर पाकिस्तानच्या कॅप्टनलाच चूका दाखवल्या, भारताविरूद्ध पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया

Last Updated:
खरं तर या खेळाडूला भारताविरूद्ध सामन्याआधी कॅप्टन सलमान आघाने 'ट्रम्पकार्ड' म्हटलं होतं. कारण त्याच्या पॉज करून गोलंदाजी करण्याच्या शैलीमुळे प्रतिस्पर्ध्यामध्ये दहशत निर्माण झाली होती.
advertisement
1/8
'ट्रम्पकार्ड' म्हणून डोक्यावर घेतलं, नंतर पाकिस्तानच्या कॅप्टनलाच चूका दाखवल्या,
टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने रविवारी पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला होता. या पराभवानंतर टीम इंडिया सूपर 8 मध्ये पोहोचली होती. तसेच पाकिस्तानच्या या पराभवानंतर एका खेळाडूची प्रतिक्रिया समोर आली आहे.
advertisement
2/8
खरं तर या खेळाडूला भारताविरूद्ध सामन्याआधी कॅप्टन सलमान आघाने 'ट्रम्पकार्ड' म्हटलं होतं. कारण त्याच्या पॉज करून गोलंदाजी करण्याच्या शैलीमुळे प्रतिस्पर्ध्यामध्ये दहशत निर्माण झाली होती. पण भारताविरूद्ध सामन्यात तो फार अशी कमालीची कामगिरी करू शकला नाही.त्यामुळेच तो फ्लॉप ठरला आहे.
advertisement
3/8
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानचा वादग्रस्त बॉलर उस्मान तारीक आहे. उस्मानने आता भारताविरूद्द सामन्यात मानहानीकारक पराभव स्विकारल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया देताना त्याने पाकिस्तान संघाला चूका दाखवल्या आहेत.
advertisement
4/8
जेव्हा तुम्ही तुमच्या मागच्या चुकांवर काम करत नाही, तो पर्यंत तुमचा संघ पुढे जाऊ शकत नाही. जर आम्ही आमच्या चुकांवर काम केले असते तर ते फार अवघड नव्हते, अशे म्हणत उस्मान तारीकने पाकिस्तान संघालाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
5/8
आपण आपल्या चुका सोडवल्या पाहिजेत, त्याच चूका पुन्हा पुन्हा केल्या नाही पाहिजेत,असेही उस्मान तारीक म्हणत पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंवर टीका केल्याचे बोलले जात आहे.
advertisement
6/8
चाहत्यांची निराशा आम्ही समजू शकतो,कारण संपूर्ण देश हा सामना पाहतो आहे. त्यामुळे आम्ही त्याचं दु:ख समजू शकतो.पण पुढच्या वेळेस जेव्हा भारताविरूद्ध खेळू तेव्हा चांगली खेळी करू असे आश्वासन उस्मान तारीकने चाहत्यांना दिले आहे.
advertisement
7/8
बाबर आझम आणि शाहिन आफ्रिदीच्या हकालपट्टीवरही उस्मान तारीकने भाष्य केले आहे. बाबर आझम आणि शाहिन आफ्रिदी या दोन्ही खेळाडूंनी अनेक सामने जिंकवले आहेत. पण एका सामन्यात चूक झाल्यामुळे त्यांना बाहेर बसवणे योग्य नाही,असेही उस्मान म्हणाला आहे.
advertisement
8/8
आता आमचा गोल इतकाच आहे की नामिबियाचा पराभव करून आम्हाला सूपर 8 मध्ये जायचे आहे. त्यानंतर आम्हाला फायनलमध्ये जाऊन वर्ल्ड कप जिंकायचा आहे, असे उस्मान तारीक म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'ट्रम्पकार्ड' म्हणून डोक्यावर घेतलं, नंतर पाकिस्तानच्या कॅप्टनलाच चूका दाखवल्या, भारताविरूद्ध पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल