'नवा गडी नवं राज्य', ICC कडून विराट कोहलीला 'जोर का झटका', किंग कोहलीची बादशाहत संपली? रोहितलाही धक्का!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli Loses No 1 ODI Ranking : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली अवघ्या एका आठवड्यानंतर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावरून घसरला आहे.
advertisement
1/7

इंदौरमध्ये शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात विराटने आपल्या शानदार फलंदाजीने आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं.
advertisement
2/7
अशातच न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने इतिहास रचलाय. डॅरिल मिशेलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवण्यात यश मिळवलं आहे. तो आता आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठ्या फरकाने नंबर वन फलंदाज बनला आहे.
advertisement
3/7
डॅरेल मिचेल 845 रेटिंग गुणांसह न्यूझीलंडचा हा फलंदाज पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने 2026 मध्ये इंदूर येथे भारताविरुद्ध खेळताना हे रेटिंग प्राप्त केलं आहे. तर विराटची रँकिंग घसरली.
advertisement
4/7
टीम इंडियाचा विराट कोहली 795 रेटिंग गुणांसह भारत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग 909 होते, जे त्याने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलं होतं.
advertisement
5/7
तर दुसरीकडे विराटनंतर रोहित शर्माला देखील मोठा धक्का बसला आहे. 757 रेटिंग गुणांसह भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे. रोहित आधी तिसऱ्या स्थानी होता. आता अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानने त्याची जागा मिळवली आहे.
advertisement
6/7
जेव्हा भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका सुरू झाली तेव्हा रोहित शर्मा पहिल्या स्थानावर होता, परंतु त्याने संपूर्ण मालिकेत एकही अर्धशतक झळकावलं नाही. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले आहेत.
advertisement
7/7
दरम्यान, तर बॉलिंगमध्ये कुलदीप यादवला मोठा धक्का बसला आहे. बॉलिंगच्या रँकिंगमध्ये कुलदीप यादव तिसऱ्या स्थानावरून थेट सातव्या स्थानी घसरलाय. त्याच्याकडे 625 पाईंट्स आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'नवा गडी नवं राज्य', ICC कडून विराट कोहलीला 'जोर का झटका', किंग कोहलीची बादशाहत संपली? रोहितलाही धक्का!