WPL 2025 : मुंबईची वाघिन शेवटपर्यंत लढली, पण 'ती' एक चूक महागात पडली, स्पर्धेतून बाहेर होण्याचं संकट?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डब्ल्यूपीएमध्ये आज गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्स यांच्यात थरारक सामना पार पडला. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात गुजरातने बाजी मारून हा सामना 11 धावांनी जिंकला आहे.
advertisement
1/7

डब्ल्यूपीएमध्ये आज गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्स यांच्यात थरारक सामना पार पडला. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात गुजरातने बाजी मारून हा सामना 11 धावांनी जिंकला आहे.या विजयासह गुजरात एलिमिनेटरमध्ये पोहोचली आहे. तर मुंबईला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
गुजरात जाएटसने दिलेल्या 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीत कौर एकटीच झुंज देत होती.तिने अर्धा सामना खेचूनही आणला होता.
advertisement
3/7
मुंबई इंडियन्सला शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता होती.त्यामुळे हरमनप्रीत कौरने पहिल्या बॉलवर सिक्स मारला.त्यानंतर दुसऱ्या बॉलवर मोठा शॉर्ट खेळला पण धाव घेतली नाही.
advertisement
4/7
त्यानंतर तिसऱ्या बॉलवर हरमनने पुन्हा सिक्स मारला. आता जवळपास 12 धावा आल्या होत्या आणखी तीन बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता होती.यावेळी चौथ्या बॉलवर हरमनप्रीत कौरने एक रन काढला. ही तिच्या हातून मोठी चुक घडली.
advertisement
5/7
खरं तर हा एक धाव काढूनही मॅच निसटली असतीच पण तरी हरमनप्रीत कौर स्ट्राईकवर असणे आवश्यत होती. पण त्यानंतर पाचव्या बॉलला विकेट पडली आणि सहाव्याला एक धाव काढता आली.
advertisement
6/7
त्यामुळे मुंबई फक्त 156 धावांपर्यंत मजल मारू शकली आणि त्यांना अवघ्या 11 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयानंतर गुजरात एलिमिनेटरमध्ये पोहोचली आहे,तर मुंबईला या पराभवानंतर मोठा धक्का बसला आहे.
advertisement
7/7
आता जर उद्याच्या सामन्यात जर युपी वॉरियर्सने जर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला तरच मुंबईला एलिमिनेटरला पोहोचण्याची संधी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL 2025 : मुंबईची वाघिन शेवटपर्यंत लढली, पण 'ती' एक चूक महागात पडली, स्पर्धेतून बाहेर होण्याचं संकट?