E20 पेट्रोल की सामान्य पेट्रोल कोणतं गाडीसाठी चांगलं? बाईक किंवा कारचे मालक असाल तर हे वाचाच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सगळीकडेच लोक E20 बद्दल बोलत आहेत आणि लवकरच बहुतांश वाहनांमध्ये हेच इंधन वापरलं जाणार आहे असं बोललं जात आहेत, ज्यामुळे अनेकांच्या मनात खूप प्रश्न आहेत. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/8

आजकाल अनेक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोल लिहिलेलं दिसतंय का? पण हे वाचल्यानंतर अनेक लोक गोंधलतात आणि त्यांना प्रश्न पडतो की हे E20 पेट्रोल चांगलं आहे की सामान्य पेट्रोलच गाडीत भरावं? हे सामान्य पेट्रोलपेक्षा वेगळं कसं? त्याचे फायदे, तोटे काय? वैगरे-वैगरे....
advertisement
2/8
शिवाय सगळीकडेच लोक E20 बद्दल बोलत आहेत आणि लवकरच बहुतांश वाहनांमध्ये हेच इंधन वापरलं जाणार आहे असं बोललं जात आहेत, ज्यामुळे अनेकांच्या मनात खूप प्रश्न आहेत. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
3/8
E20 पेट्रोल म्हणजे काय?E20 म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल (एक प्रकारचं अल्कोहोल) यांचं मिश्रण. इथेनॉल हे ऊस, मका, धान्य यांसारख्या पिकांपासून तयार केलं जातं. यामुळे परदेशातून पेट्रोल आणण्याचं अवलंबित्व कमी होतं आणि शेतकऱ्यांना मदत होते.
advertisement
4/8
पर्यावरणासाठी फायदेशीर आहे का?E20 पेट्रोल जळताना कार्बन डायऑक्साइड कमी प्रमाणात तयार होतं. यामुळे डेंगू, मलेरिया पसरवणाऱ्या मच्छरांसारखे प्रदूषणाशी संबंधित आजार काही प्रमाणात आटोक्यात ठेवता येतात. देशाचं परकीय चलन वाचतं आणि प्रदूषण कमी होतं.
advertisement
5/8
मायलेजवर परिणाम होतो का?हो, काही प्रमाणात होतो. E20 पेट्रोल वापरल्यास तुमच्या वाहनाचं मायलेज साधारण 4-7% कमी होऊ शकतं. म्हणजेच 50 किमीवर जाणाऱ्या गाडीचं अंतर 48 किमीवर येऊ शकतं.
advertisement
6/8
सर्व वाहनांसाठी योग्य आहे का?नवीन वाहनं (२०२३ नंतरची) E20 पेट्रोलसाठी तयार आहेत, त्यामुळे अशा वाहान मालकांना घाबरण्याची गरज नाही. त्यांची गाडी आणि इंजिन सेफ आहे.
advertisement
7/8
जुन्या वाहनांमध्ये इंजिनाचे रबर आणि प्लास्टिकचे भाग लवकर खराब होऊ शकतात, त्यामुळे अशा वाहनांसाठी साधं पेट्रोल वापरणं सुरक्षित आहे.
advertisement
8/8
काय निवडावं?जर तुमचं वाहन नवीन आहे, तर E20 पेट्रोल पर्यावरणासाठी चांगलं आणि देशासाठी फायद्याचं आहे. पण जर गाडी जुनी असेल, तर अजून काही काळ सामान्य पेट्रोलच वापरा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
E20 पेट्रोल की सामान्य पेट्रोल कोणतं गाडीसाठी चांगलं? बाईक किंवा कारचे मालक असाल तर हे वाचाच