TRENDING:

केबल आणि टॉवरशिवाय चालते सॅटेलाईट इंटरनेट, ब्रॉडबँडपेक्षा स्वस्त असेल?

Last Updated:
How Satellite Internet Works: टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. भारतात सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर ते सुरू करता येईल.सॅटेलाइट इंटरनेट हे आज सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ब्रॉडबँड इंटरनेटपेक्षा बरेच वेगळे असणार आहे. सॅटलाइट इंटरनेट म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
advertisement
1/7
केबल आणि टॉवरशिवाय चालते सॅटेलाईट इंटरनेट, ब्रॉडबँडपेक्षा स्वस्त असेल?
स्टारलिंकची इंटरनेट सेवा सॅटेलाइट आधारित आहे. जी ब्रॉडबँड टॉवर किंवा मोबाइल नेटवर्क वापरत नाही. सॅटेलाइट इंटरनेट ही एक सेवा आहे ज्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी उपग्रह वापरला जातो. हे ज्या भागात पारंपारिक ब्रॉडबँड किंवा मोबाइल नेटवर्क उपलब्ध नाहीत, जसे की दुर्गम गावे, डोंगराळ भाग किंवा सागरी भागांमध्ये इंटरनेट सेवा प्रदान करण्यात मदत करते.
advertisement
2/7
या सेवेसाठी सॅटेलाइट डिश आणि मॉडेम आवश्यक आहे. जेव्हा एखादा यूझर वेबसाइट उघडण्याची रिक्वेस्ट करतो, तेव्हा ही रिक्वेस्ट प्रथम सॅटेलाइट डिशमधून उपग्रहाकडे पाठवली जाते. यानंतर उपग्रह ही विनंती जमिनीवर असलेल्या नेटवर्क ऑपरेशन सेंटरला (NOC) पाठवते, जे इंटरनेटशी जोडलेले आहे.
advertisement
3/7
तेथून आवश्यक डेटा गोळा केला जातो आणि सॅटेलाइटद्वारे यूझरच्या डिव्हाइसवर परत पाठविला जातो. हा डेटा यूझरच्या डिशवर रिसिव्ह होतो आणि नंतर मॉडेम तो डीकोड करतो आणि यूझरच्या कंप्यूटरवर किंवा इतर डिव्हाइसवर पोहोचतो.
advertisement
4/7
ज्या भागात केबल किंवा मोबाईल टॉवरची सुविधा नाही अशा ठिकाणी सॅटेलाइट इंटरनेट हे इंटरनेट सेवा पुरवते. सॅटेलाइट सिग्नल उपलब्ध असलेल्या ठिकाणीही हे सेट केले जाऊ शकते.
advertisement
5/7
खरंतर सिग्नलला उपग्रहापर्यंत आणि मागे पोहोचण्यासाठी वेळ लागतो, ज्यामुळे विलंब(लेटेंसी) वाढू शकते. याव्यतिरिक्त, पाऊस किंवा हिमवर्षाव यासारखे प्रतिकूल हवामान, सिग्नलच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते.
advertisement
6/7
इतर देशांमध्ये जेथे सॅटेलाइट इंटरनेटचा वापर केला जात आहे, ते ब्रॉडबँड इंटरनेटपेक्षा महाग आहे. याचे कारण असे की सॅटेलाइट इंटरनेटशी संबंधित अनेक खर्च आहेत, जसे की रिसीव्हर डिशची किंमत. याशिवाय उपग्रह बनवणे आणि ते अवकाशात पाठवणे यासाठीही मोठा खर्च होतो. हा खर्च ग्राहकांवर टाकला जातो.
advertisement
7/7
माहितीनुसार, अमेरिकेत स्टारलिंगची किंमत प्रति महिना $110 आहे, तर हार्डवेअरसाठी एकदा $599 मोजावे लागतात. जर आपण भारताबद्दल बोललो तर त्याची किंमत अंदाजे 7000-8000 रुपये आहे. तसेच, इन्स्टॉलेशन चार्जेस वेगळे भरावे लागतील. स्टारलिंक व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी विविध योजना ऑफर करते, ज्या यूझर्सना आकर्षित करू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
केबल आणि टॉवरशिवाय चालते सॅटेलाईट इंटरनेट, ब्रॉडबँडपेक्षा स्वस्त असेल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल