स्लो इंटरनेटमुळे त्रस्त झालाय? अँड्रॉइड फोनवर करा हे 2 कामं, सुपरफास्ट चालेल फोन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
स्लो इंटरनेट स्पीडमुळेही अनेकजण हे त्रस्त असतात. तुम्हीही याच समस्येचा सामना करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खुप महत्त्वाची आहे. आज आपण हा प्रॉब्लम दूर करण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत.
advertisement
1/5

स्लो इंटरनेटची समस्या ही सामान्य आहे. जवळपास प्रत्येक स्मार्टफोन यूझरने या समस्येचा सामना केला असेल. तुम्हालाही हीच समस्या येत असेल. तसंच कधीकधी डेड झोनमद्ये फोनमध्ये अजिबात इंटरनेट चालत नाही. तर आपात्कालिन परिस्थिती ही समस्या गंभीर ठरु शकते. मात्र काही ट्रिक्समुळे तुमची ही समस्या एका झटक्यात दूर होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे इंटरनेटची स्पीड फास्ट होते.
advertisement
2/5
एअरप्लेन मोडने मिळेल फास्ट स्पीड : सिग्नल मिळवण्यासाठी स्मार्टफोन मोबाईल टॉवरशी कनेक्ट होतात. कधीकधी, तुम्ही प्रवास करत असताना, नेटवर्क गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे तुमचा फोन जवळच्या टॉवरशी कनेक्ट होऊ शकत नाही. यामुळे इंटरनेटचा वेग कमी होऊ शकतो.
advertisement
3/5
हे टाळण्यासाठी, तुमच्या फोनचा एअरप्लेन मोड बंद करा आणि नंतर पुन्हा चालू करा. यामुळे तुमचा फोन जवळच्या टॉवरशी कनेक्ट होऊ शकेल, ज्यामुळे तुम्हाला चांगले नेटवर्क अॅक्सेस आणि जलद इंटरनेट स्पीड मिळेल.
advertisement
4/5
कॅशे साफ केल्याने स्पीड देखील सुधारेल : तुम्ही वेबसाइट किंवा अॅप वापरता तेव्हा तुमचा फोन कॅशे नावाचा तात्पुरता डेटा साठवतो. यामुळे वेबसाइट किंवा अॅप पुढच्या वेळी पुन्हा उघडल्यावर फास्ट लोड होण्यास मदत होते.
advertisement
5/5
कधीकधी, हा डेटा इतका जमा होतो की त्याचा तुमच्या इंटरनेट स्पीडवर परिणाम होतो. म्हणून, सेटिंग्जमध्ये जा आणि हा डेटा काढून टाका. यामुळे जागा मोकळी होईल आणि तुम्हाला जलद इंटरनेट स्पीड मिळेल. एखादी विशिष्ट वेबसाइट किंवा अॅप खूप हळू चालत असेल तर हे खूप उपयुक्त ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
स्लो इंटरनेटमुळे त्रस्त झालाय? अँड्रॉइड फोनवर करा हे 2 कामं, सुपरफास्ट चालेल फोन