TRENDING:

OnePlus Nord 5 ची किंमत लॉन्चपूर्वीच झाली लीक! 9 जुलैला सुरु होतोय सेल

Last Updated:
OnePlus 8 जुलै रोजी भारतात Nord 5 लाँच करणार आहे आणि त्याची विक्री 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. लाँच होण्यापूर्वी, OnePlus Nord 5 ची किंमत लीक झाली आहे.
advertisement
1/6
OnePlus Nord 5 ची किंमत लॉन्चपूर्वीच झाली लीक! 9 जुलैला सुरु होतोय सेल
OnePlus Nord 5 भारतात 8 जुलै रोजी लाँच होणार आहे. कंपनीने अद्याप बरेच डिटेल्स शेअर केलेले नसले तरी, अलिकडच्या आठवड्यात या डिव्हाइसबद्दल अनेक अफवा आणि लीक समोर आल्या आहेत. ज्यामुळे संभाव्य खरेदीदारांना त्याबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. OnePlus Nord 5 ची प्रमोशनल लिस्टिंग आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह आहे. जी त्याच्या डिझाइन, रंग पर्याय, विशेष वैशिष्ट्ये आणि तांत्रिक तपशीलांची झलक देते.
advertisement
2/6
हा स्मार्टफोन शक्तिशाली Snapdragon 8s Gen 3 चिपसेटसह येणार आहे आणि त्याची अधिकृतपणे पुष्टी झाली आहे. म्हणजेच, हा फोन आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली Nord सीरीजपैकी एक असणार आहे.
advertisement
3/6
OnePlus Nord 5 launch date: OnePlus ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की Nord 5 भारतात 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. तर Nord CE 5 ची विक्री 12 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू होईल. कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही नवीन स्मार्टफोन आणि नवीन OnePlus Buds 4 हे OnePlus India वेबसाइट, Amazon आणि देशभरातील निवडक ऑफलाइन OnePlus रिटेल आउटलेट्सवर विकले जातील.
advertisement
4/6
OnePlus Nord 5 india price: OnePlus ने अद्याप त्याच्या आगामी मॉडेल्सची अधिकृत किंमत जाहीर केलेली नसली तरी, अंतर्गत वृत्तानुसार, Nord 5 ची किंमत 30,000 ते 35,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. लाँच इव्हेंटनंतर लवकरच प्री-बुकिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि हे डिव्हाइस काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध होतील.
advertisement
5/6
OnePlus Nord 5 camera: OnePlus Nord 5 त्याच्या मागील मॉडेल Nord 4 च्या तुलनेत परफॉर्मेंस आणि इमेजिंग फीचरमध्ये लक्षणीय सुधारणा आणत आहे. यात पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. मागील बाजूस, यात LYT-700 प्रायमरी सेन्सर आहे, जो फ्लॅगशिप OnePlus 13 मध्ये देखील दिसतो, तसेच 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे जो 116-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू देतो.
advertisement
6/6
OnePlus Nord 5 front camera: दुसरीकडे, जर तुम्ही सेल्फी प्रेमी असाल, तर या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP JN5 फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. ज्यामध्ये ऑटोफोकस सपोर्ट आहे. म्हणजेच, प्रत्येक सेल्फी खूप स्पष्ट असेल. हा फ्रंट कॅमेरा प्रत्येक फोटोला ड‍िटेल्‍ड पोर्ट्रेट देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
OnePlus Nord 5 ची किंमत लॉन्चपूर्वीच झाली लीक! 9 जुलैला सुरु होतोय सेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल