काही दिवसांआधी 'बाई तुझ्यापायी' या वेब सीरिजचा प्रीमियर होता. या प्रीमियर सोहळ्याला प्राजक्ता आली होती. यावेळी ती पूर्णपणे नो मेकअप लूकमध्ये होती. कोणतीही साडी किंवा ड्रेस नाही व्हाइट कलरच्या साध्या शर्टमध्ये आली होती. प्राजक्ताला इतक्या साध्या अवतारात पाहून पापाराझीही थक्क झाले. पापाराझींनी प्राजक्ताला फोटो पोझसाठी विचारलं तेव्हा प्राजक्ता नको नको म्हणाली, 'मी आज अवतारात आले आहे', असं बिनधास्त आणि प्रामाणिकपणे म्हणाली. ती तशीच फोटो द्यायला उभी राहिली.
advertisement
( Prajakta Mali Marriage : 36 वर्षांची प्राजक्ता माळी, अजून का करत नाहीये लग्न? )
त्यानंतर आता पुन्हा खएदा प्राजक्ता नो मेकअप लुकमध्ये चाहत्यांसमोर आली. प्राजक्ताचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्राजक्ताने नुकतीच सेलिब्रेटी डेन्टिस्ट शिवानी मयेकर राव हिच्या बर्थडे पार्टीसाठी गेली होती. या बर्थडे पार्टीमध्ये अनेक कलाकार मंडळी, राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. प्राजक्ता देखील बर्थडे पार्टीसाठी आली होती.
यावेळीही प्राजक्ता कोणत्याच ग्लॅमरस लुकमध्ये नव्हती. तिने नॉर्मल फ्लोरल वन पिस वेअर केला होता. ती बर्थडे गर्ल शिवानीला भेटली आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्यासोबत काही फोटो दिले. त्यानंतर पापाराझींनी प्राजक्ताला सोलो फोटोसाठी थांबायला सांगितलं. तेव्हा प्राजक्ताने पुन्हा एकदा प्रामाणिकपणे आणि 'बिनधास्त सांगितलं की 'एवढं आवरलेलं नाही मी सोलोसाठी". नो मेकअप लुकमध्येच प्राजक्ताने पापाराझींना फोटो दिले.
प्राजक्ताचा नो मेकअप लुक देखील चर्चेत आला आहे. साध्या कपड्यात, मेकअप न करताही प्राजक्ता खूप सुंदर दिसतेय हे पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. तिच्या चाहत्यांनी तिच्या या नो मेकअप लुकलाही पसंती दिली आहे.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतच असते. तिचा 'फुलवंती' हा सिनेमा रिलीज झाला होता. ज्याला अनेक पुरस्कार मिळाले. हा सिनेमा प्राजक्ताने प्रोड्यूस केला होता. प्राजक्ताचे काही नवे सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत.
