रियलमी नोट 80 फोन 9 हजार रुपयांत लॉन्च! मिळते 6300mAh बॅटरी, दमदार डिस्प्ले
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
रियलमी नोट 80 बचेट स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 6.74-इंच 90Hz डिस्प्ले, Unisoc T7250 प्रोसेसर आणि 6300mAh बॅटरीसह येतो. याची सुरुवातीची किंमत जवळपसा 9,000 रुपये आहे आणि यामध्ये अँड्रॉइड 15 वर बेस्ड रियलमी UI 6.0, 8MP कॅमेरा आणि 128GB पर्यंत स्टोरेज सारखे फीचर्स मिळतात...
advertisement
1/6

चीनी स्मार्टफोन कंपनी रियलमीने आपला नवीन बजेट स्मार्टफोन रियलमी नोट 80 लॉन्च केला आहे. सध्या हा फोन निवडक मार्केट्समध्ये उपलब्ध आहे आणि इंडोनेशियामध्ये कंपनीची वेबसाइटच्या माध्यमातून खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन्स आणि दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. यामध्ये मोठी 6300mAh बॅटरी, 90Hz डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
advertisement
2/6
रियलमी नोट 80 ची सुरुवातीची किंमत इंडोनेशियामध्ये IDR 16,99,000 (जवळपास ₹9,000) ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. तसंच 4GB RAM + 128GB स्टोरेजच्या टॉप व्हेरिएंटची किंमत IDR 19,99,000 (जवळपास ₹11,000) आहे. हा फोन ग्लेशियर ब्लू आणि स्टॉर्म ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
3/6
Realme Note 80 ची फीचर्स : Realme Note 80 मध्ये 6.74-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 563 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन Panda MN228 प्रोटेक्शनसह देखील येते. परफॉर्मेंससाठी यामध्ये Unisoc T7250 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे. जो माली-G57 GPUसह येतो. फोनमध्ये 4GB LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंत eMMC 5.1 स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित रियलमी UI 6.0 वर चालतो.
advertisement
4/6
कॅमेरा आणि बॅटरी : कॅमेराविषयी बोलायचं झाल्यास, रियलमी नोट 80 मध्ये 8MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. जो ऑटोफोकसर आणि एलईडी फ्लॅशसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 720p व्हिडिओ रेकॉर्डिंग (30fps) पर्यंत सपोर्ट करतो.
advertisement
5/6
कनेक्टिव्हिटी आणि इतर फीचर्स : पॉवरसाठी फोनमध्ये 6300mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी 15W वायर्ड चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक मिळते.
advertisement
6/6
या व्यतिरिक्त यामध्ये GPS, GLONASS, गॅलिलियो आणि BeiDou सपोर्टही देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनचा वजन जवळपास 197 ग्राम आहे आणि याची जाडी 7.94mm आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
रियलमी नोट 80 फोन 9 हजार रुपयांत लॉन्च! मिळते 6300mAh बॅटरी, दमदार डिस्प्ले