WhatsAppने लॉन्च आजवरचं सर्वांत भन्नाट फीचर! पाहा काय वेगळं असणार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
मेटाचे स्वामित्व असलेले व्हॉट्सॲप नवनवीन फीचर बाजारात आणत असते. आता यामध्ये एक नवे फीचर जोडले गेले आहे. यामुळे चॅटिंगचा अनुभव आणखीच खास होणार आहे.
advertisement
1/7

व्हॉट्सॲप हे एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. या ॲपमुळे आपला लांबचा मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्याशी सहज संपर्क करणे शक्य झाले आहे.
advertisement
2/7
आजकाल मित्रांशी चॅट करण्यापासून ते ऑफिसच्या कामकाजापर्यंत अनेक गोष्टी व्हॉट्सॲपवर केली जातात.
advertisement
3/7
मेटाचे स्वामित्व असलेले व्हॉट्सॲप नवनवीन फीचर बाजारात आणत असते. आता यामध्ये एक नवे फीचर जोडले गेले आहे. यामुळे चॅटिंगचा अनुभव आणखीच खास होणार आहे.
advertisement
4/7
यापुढे आपल्याला कोणाचेही व्हॉट्सॲप स्टेटस लाइक करू शकणार आहोत. याआधी आपण केवळ स्टेटसवर रिॲक्ट किंवा रिप्लाय देऊ शकत होतो.
advertisement
5/7
व्हॉट्सॲपचे हे फीचर आपल्याला रिप्लाय बटणाच्या शेजारी हृदयाच्या आकारात दिसेल. यावर क्लिक करून आपण व्हॉट्सॲप स्टेटस लाइक करू शकणार आहोत. स्टेटस लाइक केल्यानंतर हृदयाचा रंग हिरवा होईल.
advertisement
6/7
त्याचबरोबर ज्याचं स्टेटस आपण लाइक केलं आहे, त्याला त्याच्या स्टेटसवर हिरवे हार्ट्स इमोजी तरंगताना दिसतील. इतकंच नाही तर व्हॉट्सॲप त्यांच्या यूजर्ससाठी नव्या व्हॉइस मोड फीचरवर काम करत आहे.
advertisement
7/7
व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरमुळे यूजर्स त्यांचा आवाज वापरून एआय चॅटबॉटशी द्वि-मार्गी संभाषण करू शकतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WhatsAppने लॉन्च आजवरचं सर्वांत भन्नाट फीचर! पाहा काय वेगळं असणार