WiFi Router किती वर्षात बदलावं? चेंज केल्याने स्पीड वाढते? जाणून घ्या डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याचं युग हे इंटरनेटंच युग आहे. फोन असो किंवा स्मार्ट टीव्ही सर्वांसाठी इंटरनेट गरजेचं असतं. अशावेळी लोक WiFi राउटरचा वापर करतात. पण ते किती दिवसाय बदलावं? चला पाहूया.
advertisement
1/7

मुंबई : सध्या डिजिटल युग सुरूये. या डिजिटल युगाचा प्राण म्हणजे इंटरनेट आहे. इंटरनेटवरच ही डिजिटल जग उभं आहे. स्मार्टफोनचा वापर असो स्मार्ट टीव्ही असो किंवा मग ऑफिसचं काम सर्व कामांसाठी इंटरनेट हे गरजेचंय. अशावेळी लोक घरात WiFi राउटर लावतात. ज्यामुळे त्यांना इंटरनेट वापरताना कोणतीही समस्या येणार नाही. पण WiFi चेही एक वय असते हे तुम्हाला माहियीते का?
advertisement
2/7
जुन राउटर हे स्लो इंटरनेट देतं, यासोबतच ऑनलाइन सुरक्षेसाठी धोका ठरू शकतं. एक्सपर्ट्स सांगतात की, योग्य स्पीड आणि सिक्योरिटीसाठी वेळोवेळी राउटर बदलणं गरजेचं असतं. चला याचं कारण जाणून घेऊया.
advertisement
3/7
4-5 वर्षात राउटर का बदलावं? : आपल्यापैकी बरेच लोक हे एकदा राउटर खरेदी करतात आणि दीर्घकाळ वापरतात. पण प्रत्येक टेक्नॉलॉजीची एक लिमिट असते. रिपोर्ट्स आणि एक्सपर्ट्स सांगतात की, 3 ते 5 वर्षांनी राउटर अपग्रेड करायला हवं. कारण वेळेसोबतच त्याचे हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर दोन्ही जुने होतात. ज्याचा परिणाम परफॉर्मेंसवर होतो. नवं राउटर फक्त चांगली स्पीड देत नाही तर नवीन टेक्नॉलॉजीला सपोर्टही करते. ज्यामुळे इंटरनेट वापरताना आणखी सोपं जातं.
advertisement
4/7
जुन्या राउटरमुळे इंटरनेट स्लो का होतं? : आपल्यापैकी बरेच लोक हे वर्षानुवर्षे एकच राउटर वापरतोय. खरंतर जुने राउटर हे Wi-Fi 4 किंवा Wi-Fi 5 सारक्या जुन्या स्टँडर्डवर काम करतात. ज्यामुळे इंटरनेट स्पीड लिमिटेड होते. मग आपण हाय-स्पीड प्लान घेऊनही फायदा होत नाही. कारण जुना राउटर स्पीड पूर्णपणे डिलिव्हर करू शकतन नाही. यामुळे पुन्हा-पुन्हा बफरिंग, स्लो डाउनलोड आणि व्हिडिओ कॉलमध्ये प्रॉब्लम येतो. नवं राउटर Wi-Fi 6 सारख्या अडव्हान्स टेक्निकसह येतात. ज्यामुळे वेगवान आणि स्टेबल कनेक्शन मिळतं.
advertisement
5/7
राउटर बदलणं सुरक्षेसाठीही गरजेचं : जुन्या राउटचा वापर हा सिक्योरिटीसाठी हानिकार ठरतो. कारण कंपन्या कंपन्या काही काळाने जुन्या डिव्हाइसला अपडेट देतच नाहीत. ज्यामुळे हॅकर्स अशा राउटर्सला टार्गेट करतात. ज्यामुळे तुमची पर्सनल माहिती, पासवर्ड आणि बँकिंग डिटेल्सही लीक होण्याचा धोका वाढतो. नवे राउटर WPA3 सारख्या आधुनिक सिक्योरिटी फीचर्ससह येतात. ज्यामुळे नेटवर्क जास्त सुरक्षित बनते.
advertisement
6/7
रेंज आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्टमध्येही राउटर होत कमकुवत : जास्त दिवस राउटर वापरल्यानंतर राउटरच्या आतील कंपोनेंट्स आणि अँटीनाही कमकुवत होतात. ज्यामुळे सिग्नलची ताकद कमी होते. याचा परिणाम घरातील वेगवेगळ्या खोल्यांमधील स्पीडवर लगेच दिसतो.
advertisement
7/7
तुम्ही जुनं राउटर वापरता तेव्हा जास्त डिव्हाइसही हँडल होत नाहीत. खरंतर आजच्या काळात प्रत्येक घरात अनेक स्मार्ट डीव्हाइस जोडलेले असतात. नवे राउटर MU-MIMO आणि बीमफॉर्मिंगसारख्या टेक्नॉलॉजसह येतात. जे भारी रेंज आणि देतात. यासोबतच अनेक डिव्हाइसला सपोर्ट करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WiFi Router किती वर्षात बदलावं? चेंज केल्याने स्पीड वाढते? जाणून घ्या डिटेल्स