शनीची बदलणार चाल! 'या' राशींना होणार जबरदस्त फायदा, 3 राशींचं वाढणार टेन्शन; तुमची रास नाही ना यात?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा अत्यंत संथ गतीने चालणारा आणि 'कर्मफळदाता' ग्रह मानला जातो. शनीच्या एका लहानशा हालचालीचाही सर्व 12 राशींवर खोलवर परिणाम होतो.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा अत्यंत संथ गतीने चालणारा आणि 'कर्मफळदाता' ग्रह मानला जातो. शनीच्या एका लहानशा हालचालीचाही सर्व 12 राशींवर खोलवर परिणाम होतो. 21 मार्च 2026 रोजी शनीने उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केला असून, तो सध्या मीन राशीत स्थित आहे.
advertisement
2/7
वृषभ - प्रगती आणि आर्थिक लाभ: शनीचा हा बदल वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि पदोन्नतीचे योग येतील. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कामे आता मार्गी लागतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल.
advertisement
3/7
मिथुन - करिअरमध्ये नवीन संधी: मिथुन राशीच्या जातकांना शनीच्या कृपेने करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनुकूल आहे. व्यवसायात नवीन कंत्राटे मिळतील आणि तुमच्या कष्टाचे चीज होईल. प्रवासातूनही तुम्हाला लाभ मिळण्याचे संकेत आहेत.
advertisement
4/7
कर्क - मानसिक शांतता आणि यश: कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची ही चाल अनुकूल असेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही कठीण आव्हानांना धैर्याने सामोरे जाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
advertisement
5/7
मेष - सावधगिरी बाळगा: मेष राशीच्या लोकांसाठी शनी सध्या 12 व्या भावात असल्याने तुमच्यावर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. या काळात खर्चात अचानक वाढ होऊ शकते. गुंवतणुकीचे निर्णय घाईत घेऊ नका, अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
advertisement
6/7
सिंह - ढैय्याचा त्रास आणि अडथळे: सिंह राशीवर सध्या शनीच्या ढैय्याचा प्रभाव आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कोणाशी तरी विनाकारण वाद होऊ शकतात. आजारांवर खर्च होण्याची शक्यता असल्याने खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही कायदेशीर कचाट्यात पडणे टाळावे.
advertisement
7/7
मीन - मानसिक ताण आणि जबाबदाऱ्या: शनी तुमच्याच राशीत विराजमान असून तुमच्यावर साडेसातीचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कर्माचे कठोर फळ मिळेल. जबाबदाऱ्यांचे ओझे वाढल्याने मानसिक थकवा जाणवू शकतो. कामात सातत्य ठेवल्यास शनी तुम्हाला शिस्तीचे गोड फळ नक्की देईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
शनीची बदलणार चाल! 'या' राशींना होणार जबरदस्त फायदा, 3 राशींचं वाढणार टेन्शन; तुमची रास नाही ना यात?