Marathi Serial : हा काय प्रकार आहे, बंद करा! नव्या मराठी मालिकेतील 'तो' सीन पाहून भडकले प्रेक्षक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sanai Chaughade : काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली सनई चौघडे मालिका ज्यातील नव्या एपिसोडच्या प्रोमोमधील एक सीन पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांत नवीन मालिकांचा प्रोमो आलेत. त्यापैकी काही मालिका सुरूही झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सनई चौघडे मालिका. झी मराठीवर 16 मार्चपासून ही मालिका सुरू झाली आहे.
advertisement
2/7
सनई चौघडेच्या 23 मार्चला रिलीज होणाऱ्या नव्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आला आहे. ज्यातील एक सीन पाहून प्रेक्षक भडकले आहेत.
advertisement
3/7
प्रोमोत शर्वरी खानोलकरांच्या घरात जयच्या आजीला शोधत एका रूममध्ये जाते. या रूममध्ये टेबलवर सोन्याचे दागिने ठेवलेले असतात. पण खोलीत अंधार असतो आणि शर्वरीला काहीच दिसत नसतं.
advertisement
4/7
रूममध्ये पुढे गेल्यावर शर्वरीचा धक्का लागतो आणि टेबलवरील सोन्याचा एक हार खाली पडतो जो शर्वरीच्या पायाला लागतो. खाली काय पडलं म्हणून शर्वरी खालू वाकून तो शोधायला जाते. तितक्यात जयची आई तेजस्विनी येते आणि ती शर्वरीच्या हातात हार पाहते.
advertisement
5/7
तेजस्विनी शर्वरीवर चोरीचा आळ घालते. शर्वरीला ती रूममधून बाहेर खेचत आणते आणि ही माझ्या रूममध्ये काय करत होती असं विचारते.
advertisement
6/7
शर्वरी तिला नेमकं काय झालं ते सांगण्याचा प्रयत्न करते. पण तेजस्विनी तिचं काही ऐकत नाही ती बोलत असतानाच ती सगळ्यांसमोर तिच्या थोबाडीत मारते.
advertisement
7/7
हाच तो सीन आहे, जो पाहून प्रेक्षक भडकलेत. एका प्रेक्षकाने कमेंट केली आहे. का काय प्रकार आहे. सावली, पारू, कमळी, तारिणी, श्रावणी आणि आता शर्वरी सगळ्यांना थोबाडीत पडतात. असं नायिकांना थोबाडीत मारलं तर कसं चालले. प्लीज असं थोबाडीत मारणं बंद करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Serial : हा काय प्रकार आहे, बंद करा! नव्या मराठी मालिकेतील 'तो' सीन पाहून भडकले प्रेक्षक