मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा रामदास थोरात (वय 21) हा 18 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास बाजारतळ परिसरातून आपल्या शेताकडे जात होता. त्यावेळी औदुंबर थोरात, विशाल थोरात आणि बाळू थोरात या तिघांनी त्याला रस्त्यात अडवले. त्यांनी कृष्णाला एका मुलीला पाहण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली.
विवाहित पुतणीला गाठलं, गुंगीचं औषध पाजलं अन्..., चुलत्याच्या भयंकर कृत्यानं बीडमध्ये संताप
advertisement
घरी कोणी नसल्यामुळे कृष्णाने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. या कारणावरून तिघेही संतापले आणि त्यांनी कृष्णाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच लोखंडी गजाने चेहऱ्यावर प्रहार केल्याने तो जखमी झाला.
घटनेदरम्यान झालेल्या आरडाओरडीनंतर महादेव थोरात आणि त्यांची पत्नी दिपाली थोरात हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. दिपाली यांच्या हातावर काठीने मारहाण करण्यात आली, तर दोघांनाही धमक्या देण्यात आल्या. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर कृष्णा थोरात यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून औदुंबर, विशाल आणि बाळू थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.






