WiFi राउटरवरील 'या' लाईट्स सांगतात तुमच्या इंटरनेटचं रहस्य, आताच माहित करुन घ्या, नाहीतर होईल पश्चाताप
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकजण या लाईट्सना केवळ सजावटीचा भाग समजून दुर्लक्ष करतात, पण खरं तर या छोट्या-छोट्या लाईट्समधून तुमच्या इंटरनेटचं संपूर्ण आरोग्य समजतं.
advertisement
1/9

आधी फक्त ऑफिसेस किंवा कामाच्या ठिकाणी वायफाय लावलं जायचं. पण आता तर घराघरात देखील वायफाय लावलं जातं. काम असो, अभ्यास, मनोरंजन किंवा स्मार्ट टीव्ही पाहणे सगळं काही आता इंटरनेटवरच अवलंबून आहे. पण आपल्या इंटरनेटच्या गतीबद्दल आणि कनेक्शन व्यवस्थित चालू आहे की नाही, याचा पहिला इशारा देणारी गोष्ट म्हणजे आपल्या WiFi राउटरवरील रंगीबेरंगी लाईट्स.
advertisement
2/9
अनेकजण या लाईट्सना केवळ सजावटीचा भाग समजून दुर्लक्ष करतात, पण खरं तर या छोट्या-छोट्या लाईट्समधून तुमच्या इंटरनेटचं संपूर्ण आरोग्य समजतं.
advertisement
3/9
WiFi राउटरवरील रंग आणि त्यांचा अर्थ
advertisement
4/9
निळा रंग:निळी लाईट साधारणतः हाय-स्पीड डेटा ट्रान्सफर किंवा 5GHz कनेक्शनसाठी असते. ही लाईट जर ब्लिंक होत असेल, तर याचा अर्थ डेटा सक्रियपणे पाठवला किंवा मिळवला जात आहे.
advertisement
5/9
लाल रंग:ही लाईट म्हणजे चेतावणीचा सिग्नल. इंटरनेट कनेक्शनमध्ये अडचण, नेटवर्क डाउन असणं किंवा राउटरमध्ये काही तांत्रिक बिघाड, हे सर्व लाल लाईट दर्शवते. जर ही लाईट सतत चालू असेल, तर आपल्या इंटरनेट सेवा पुरवठादाराशी (ISP) संपर्क साधणं आवश्यक आहे.
advertisement
6/9
पांढरा किंवा पिवळा रंग:काही राउटर्समध्ये हा रंग वायफाय सेटअप चालू असल्याचं किंवा नवीन डिव्हाइस जोडत असल्याचं दर्शवतो.
advertisement
7/9
राउटरच्या लाईट्स आणि इंटरनेट स्पीडचा संबंधअनेकांना वाटतं की या लाईट्स फक्त शोभेच्या असतात, पण प्रत्यक्षात त्यांचा इंटरनेट स्पीडशी थेट संबंध असतो. उदा. जर निळी लाईट ब्लिंक होत असेल, तर ते जलद स्पीडने डेटा ट्रान्सफर होत असल्याचं चिन्ह आहे. पण अचानक इंटरनेट स्लो झालं आणि लाल लाईट लागली, तर ते नेटवर्कमध्ये समस्या असल्याचं स्पष्ट संकेत आहे.
advertisement
8/9
राउटरच्या लाईट्सकडे लक्ष दिलं, तर इंटरनेटची अडचण पटकन समजू शकते.उदा. जर तुम्ही व्हिडिओ पाहताना बफरिंग होत असेल आणि त्याचवेळी लाल लाईट लागलेली असेल, तर समस्या डिव्हाइसमध्ये नाही, तर राउटर किंवा कनेक्शनमध्ये आहे असं समजावं.
advertisement
9/9
लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टीराउटरच्या लाईट्सकडे नियमित लक्ष द्या.दर काही दिवसांनी राउटर रिस्टार्ट करा.सिग्नल आणि सेटिंग्ज तपासा.शक्य असल्यास, राउटरला थंड आणि ओपन जागेत ठेवा.यामुळे इंटरनेटची स्पीड आणि स्थिरता दोन्ही सुधारतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WiFi राउटरवरील 'या' लाईट्स सांगतात तुमच्या इंटरनेटचं रहस्य, आताच माहित करुन घ्या, नाहीतर होईल पश्चाताप