डोंबिवलीत अडीच लाख पणत्यांमधून साकारली भारतमातेची मोझॅक प्रतिमा, जागतिक विक्रमाची नोंद
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोंबिवली जिमखाना मैदानावर २.५ लाख रंगीत पणत्यांनी साकारलेली भारतमातेची भव्य मोझॅक कलाकृती वर्ल्ड रेकॉर्ड्स India मध्ये नोंदली गेली असून, रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने साकारली आहे.
advertisement
1/6

डोंबिवलीत देशभक्ती, कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळत असून अडीच लाखांहून अधिक रंगीत पणत्यांमधून साकारलेली भारतमातेची भव्य मोझॅक कलाकृती सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या अद्भुत कलाकृतीने वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अंतर्गत जागतिक विक्रमाची नोंद केली असून, हा उपक्रम भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे.
advertisement
2/6
डोंबिवली जिमखाना मैदानावर उभारण्यात आलेली ही भव्य कलाकृती पाहण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक गर्दी करत आहेत. ९५ फूट उंची आणि ७५ फूट रुंदीची भारतमातेची ही मोझॅक रचना सुमारे अडीच लाख रंगेबिरंगी पणत्यांच्या सहाय्याने साकारण्यात आली असून, तिचा देखावा पाहणाऱ्यांना भारावून टाकणारा आहे.
advertisement
3/6
या उपक्रमाबाबत माहिती देताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, डोंबिवली हे मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेचे माहेरघर आहे. भारतमातेचे पूजन आणि वंदन ही आपली संस्कृती असून, ‘वंदे मातरम’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतमातेला अनोख्या स्वरूपात मानवंदना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
4/6
आपण सर्वजण या मातीतून घडलेली लेकरं आहोत आणि त्यामुळे मातीपासून तयार केलेल्या पणत्यांतून भारतमातेचे रूप साकारण्याची कल्पना पुढे आली, असे त्यांनी सांगितले. ही भव्य कलाकृती कलाकार चेतन राऊत, प्रभू कापसे आणि वैभव कापसे या पितापुत्रांच्या जोडीने तसेच डोंबिवलीकर आर्टिस्ट टीमने अवघ्या नऊ दिवसांत साकारली.
advertisement
5/6
[caption id="attachment_1568632" align="alignnone" width="750"] या काळात कलाकारांनी अहोरात्र मेहनत घेत प्रत्येक पणती रंगवून, ती योग्य ठिकाणी बसवत कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना उभा केला. या प्रयत्नांचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी विशेष कौतुक केलं. डोंबिवली जिमखानातर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या ‘उत्सव’ या वार्षिक मेळ्याच्या निमित्ताने ही कलाकृती सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
6/6
२८ डिसेंबर २०२५ पर्यंत ही भारतमातेची मोझॅक कलाकृती पाहता येणार असून, अधिकाधिक नागरिकांनी येऊन या ऐतिहासिक आणि देशभक्तीपूर्ण कलाकृतीचा अनुभव घ्यावा, असं आवाहन रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. या कलाकृतीची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
डोंबिवलीत अडीच लाख पणत्यांमधून साकारली भारतमातेची मोझॅक प्रतिमा, जागतिक विक्रमाची नोंद